Join us  

स्कूल वाली Love Story! तुषार देशपांडेचा प्रेयसी नभासोबत साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 11:39 AM

Open in App
1 / 5

चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याचा सोमवारी गर्लफ्रेंड नभा गड्डमवार हिच्यासोबत साखरपुडा झाला. त्याने इंस्टाग्रावर फोटो पोस्ट करून ही आनंदाची बातमी दिली.

2 / 5

तुषार देशपांडेच्या साखरपुड्याला CSKचा अष्टपैलू शिवम दुबे उपस्थित होता. नभा ही तुषारची शाळेतील मैत्रीण आहे. She got promoted from my school crush to MY FIANCÉ, असे त्याने त्याच्या पोस्टवर लिहिले आहे.

3 / 5

ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आदी खेळाडूंनी तुषार देशपांडेचे अभिनंदन केले आहे. आमच्या क्लबमध्ये तुझे स्वागत भाऊ, असे ऋतूने लिहीले आहे. ऋतुराजनेही ४ जूनला गर्लफ्रेंड उत्कर्षा पवारसोबत लग्न केले.

4 / 5

नभा गड्डमवार कोण, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर ती एक आर्टिस्ट असल्याचे तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून समजले. त्यापलिकडे तिची फार माहिती मिळालेली नाही.

5 / 5

दरम्यान, तुषार देशपांडेने आयपीएल २०२३ मध्ये CSKसाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या होता. MS Dhoni च्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाचवे आयपीएल जेतेपद जिंकले.

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्स
Open in App