Saurabh Kumar, Team India Test Squad, IND vs SL : IPL 2022 Mega Auction मध्ये UNSOLD राहिलेल्या 'या' नव्या चेहऱ्याला भारताच्या कसोटी संघात मिळाली संधी! कोण आहे 'तो'.. जाणून घ्या

भारताच्या आगामी कसोटी मालिकेसाठी शनिवारी झाली संघाची घोषणा

Saurabh Kumar, Team India Test Squad, IND vs SL : भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी आज रोहित शर्माची अधिकृत घोषणा करण्यात आली. आगामी श्रीलंका विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी आज १८ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला. त्यात सौरभ कुमार नावाच्या एका नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली.

अनुभवी इशांत शर्माला संघातून वगळण्यात आले असून त्याच्या जागी गोलंदाजांच्या ताफ्यात सौरभला स्थान मिळाले आहे. त्यामुळे हा नवा चेहरा असलेला सौरभ कुमार नक्की कोण आहे, हे जाणून घेऊया.

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर भारतीय संघात स्टँडबाय खेळाडू म्हणून असलेल्या सौरभला अखेर १८ खेळाडूंच्या संघात आज स्थान मिळाले. सौरभ कुमार हा स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करतो. २८ वर्षीय सौरभ हा एक अष्टपैलू खेळाडू असून तो त्याची सर्वात मोठी ताकद त्याची डावखुरी फिरकी गोलंदाजी आहे.

सौरभ मूळचा उत्तर प्रदेशातील बागपतचा असून त्याचं कुटुंब मेरठमध्ये राहतं. सौरभचे वडील ऑल इंडिया रेडिओमध्ये कार्यरत होते. त्याची आई गृहिणी आहे. २०२१ मध्ये सौरभ कुमारने नेहा साबी हिच्याशी लग्न केलं.

सौरभ वयाच्या १६व्या वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. २०१४ मध्ये त्याने सर्व्हिसेसच्या संघाकडून रणजी क्रिकेट खेळला. त्यानंतर २०१५ पासून तो उत्तर प्रदेशच्या संघाचा भाग बनला.

सौरभ कुमारने आतापर्यंतच्या कारकिर्दीत ४६ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यात १,५७२ धावा आणि १९६ बळी घेतले आहेत.

सौरभ कुमारने आतापर्यंतच्या कारकिर्दीत ४६ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यात १,५७२ धावा आणि १९६ बळी घेतले आहेत.

सौरभची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी ३२ धावांत ७ बळी अशी आहे. तर सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी ६५ धावांत १४ बळी अशी आहे. फलंदाजी दरम्यानही त्याने २ शतके आणि ८ अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या १३३ धावा आहे.

सौरभ कुमारला २०१७ साली पुणे सुपर जायंट्स संघाने १० लाखाला विकत घेतले होते तर २०२१ साली पंजाब किंग्सने २० लाखाच्या किमतीत त्याला संघात दाखल करून घेतले होते. यंदाच्या ऑक्शनमध्ये मात्र त्याच्यावर कोणीही बोली लावली नाही.

IPL 2022 च्या मेगालिलावात जरी त्याला संधी मिळाली नसली तरी त्याला आता टीम इंडियाच्या कसोटी संघात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे तो आता भारतीय संघात कसा खेळतो याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.