Instagram Conversation with actress Viral: टीम इंडियाच्या Venkatesh Iyer चं अभिनेत्रीसोबत अफेअर? फोटोवरील कमेंटवरून चर्चांना उधाण

मराठी कुटुंबात जन्मलेल्या या अभिनेत्रीशी जोडलं जातंय क्रिकेटरसोबत नाव

Instagram Conversation with actress Viral: भारतीय क्रिकेटपटू आणि KKRचा सलामीवीर Venkatesh Iyer हा सध्या एका विशेष कारणामुळे चर्चेत आहे.

व्यंकटेश अय्यरने एका मराठी भाषिक कुटुंबात जन्मलेल्या अभिनेत्रीच्या फोटोवर कमेंट केली होती. तेव्हापासून या दोघांचं अफेअर सुरू आहे का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

व्यंकटेश अय्यरच्या कमेंटनंतर चर्चेत आलेली ही अभिनेत्री कोण आणि नक्की काय घडला होता किस्सा... जाणून घेऊया

व्यंकटेश अय्यरने अभिनेत्रीच्या फोटोवर 'क्यूट' (cute) अशी कमेंट केली होती. त्या कमेंटवर त्या अभिनेत्रीनेही अय्यरला टॅग करून 'कोण क्यूट? तू?' असा रिप्लाय दिला होता. ही अभिनेत्री म्हणजेच प्रियांका जवळकर.

प्रियांका जवळकर ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिचा जन्म १२ नोव्हेंबर १९९२ला आंध्र प्रदेशमध्ये मराठी कुटुंबात झाला. पण ती तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये अभिनय करते.

प्रियांकाने २०१७ मध्ये 'काला वरम आये' या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर टॅक्सीवाला, थिम्मारुसु आणि एसआर कल्याणमंडपम यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे.

ती कॉम्प्युटर सायन्सची पदवीधर असून तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, हैदराबाद येथून फॅशन डिझायनिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला आहे.

त्यानंतर ८ महिन्यांच्या सांख्यिकी अभ्यासक्रमासाठी ती अमेरिकेत गेली होती. तिने ६ महिने MNC कंपनीत काम केलं आहे.

तिने सोशल मीडियावर तिचे काही फोटो अपलोड केल्यानंतर तिला चित्रपटांसाठी संपर्क करण्यात आला. संपत व्ही. कुमार दिग्दर्शित काला वरम आये या तेलगू भाषेतील चित्रपटातून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.