पाकिस्तानची अलिया रियाज नक्की आहे तरी कोण? MS धोनीशी काय आहे कनेक्शन?

क्रिकेटपटूंच्या ग्लॅमरस आयुष्याबाबत कायमच चर्चा रंगलेल्या असतात

Pakistan Aliya Riyaz MS Dhoni: क्रिकेट आणि ग्लॅमर हे समीकरण खेळाडू आणि चाहत्यांसाठी फारसे नवीन नाही. देशोदेशी टी२० लीग स्पर्धा सुरू झाल्यापासून फ्रँचायझी क्रिकेटमध्ये अभिनेते-अभिनेत्री हजेरी लावताना दिसतात.

क्रिकेटपटूही हल्ली कायमच प्रसिद्धीच्या लाइमलाइटमध्ये असतात. फिटनेस आणि सौंदर्याच्या जोरावर अनेक पुरूष व महिला क्रिकेटपटू प्रसिद्ध होतात. काही वेळा तर क्रिकेटपटू आपल्या प्रेमप्रकरणांमुळे चर्चेचा विषय ठरतात.

महिला क्रिकेटला गेल्या काही वर्षांपासून 'अच्छे दिन' आले आहेत. महिला क्रिकेटपटू त्यांच्या खेळासह त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्धीझोतात असल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या पाकिस्तानी अलिया रियाज या महिला क्रिकेटपटूची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तिचे नाव सध्या थेट भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्यासोबत घेतले जात आहे. जाणून घ्या नक्की प्रकरण काय?

आलियाचा जन्म 24 सप्टेंबर 1992 रोजी पाकिस्तानातील रावळपिंडी येथे झाला. पाकिस्तानी क्रिकेटपटू आलिया रियाझ फलंदाजीसोबतच ऑफ स्पिनर गोलंदाज देखील आहे.

अलियाने 2014 मध्ये पाकिस्तान कडून पदार्पण केले. तेव्हापासून तिने 53 एकदिवसीय आणि 74 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिने संघासाठी अनुक्रमे 985 आणि 843 धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिने एकूण 7 अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय आलियाच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये 8 आणि टी-20मध्ये 7 विकेट्स आहेत.

आलिया ही एक अष्टपैलू खेळाडू आहे. तिने नुकतीच आफ्रिकेविरूद्ध विनिंग सिक्सर मारून संघाला विजय मिळवून दिला.

तिने लगावलेला षटकार पाहून अनेकांना धोनीची आणि त्याने मारलेल्या षटकाराची आठवण झाली. त्यामुळे सध्या अलिया आणि धोनीचे नाव एकत्र घेतले जात आहे.