Ind vs Pak महामुकाबल्यापूर्वी गोड बातमी! इशान किशनच्या आजोबांनी नात सुनेचे नाव सांगितले...

Who is Ishan Kishan Girlfriend: मिस डीवा २०१८ ची विजेती आणि ईशान किशनची होणारी पत्नी अदिती हुंडिया नेमकी कोण आहे?

आज कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये टी-२० वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्याच्या काही तास आधीच टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर आणि बिहारचा सुपुत्र ईशान किशन याच्या लग्नाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. ईशानच्या अफेअरबाबत आजवर अनेक चर्चा होत्या, मात्र आता खुद्द त्याच्या आजोबांनीच त्याच्या प्रेयसीचे नाव जाहीर करत या नात्यावर अधिकृत मोहोर उमटवली आहे.

ईशान किशनचे आजोबा अनुराग पांडेय यांनी एका मुलाखतीत ईशानच्या रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा केला. ते म्हणाले, "ईशान ज्या मुलीशी लग्न करेल ती आम्हाला स्वीकार्य आहे. त्याच्या मोठ्या भावाने पल्लवीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती, आम्ही त्यांचे लग्न लावून दिले. आता ईशानचीही वेळ आली आहे. अदिती हुंडिया ही त्याची गर्लफ्रेंड आहे. ती जयपूरची राहणारी असून प्रसिद्ध मॉडेल आहे. तिने मिस इंडिया स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले होते."

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेला टी-२० वर्ल्ड कप संपल्यानंतर ईशान किशन लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे. जरी लग्नाची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नसली, तरी आजोबांच्या या विधानामुळे ईशानच्या घरी सनई-चौघडे वाजण्याची तयारी सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अदिती हुंडिया ही फॅशन विश्वातील एक मोठे नाव आहे. तिने २०१७ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता आणि ती 'मिस सुपरनॅशनल इंडिया २०१८' ची विजेती आहे. ईशान आणि अदिती गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा क्रिकेट सामन्यांदरम्यान ती ईशानला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहिल्याचेही पाहायला मिळाले आहे.

अदिती हुंडिया ही केवळ एक क्रिकेटरची गर्लफ्रेंड नसून तिची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. अदिती राजस्थानच्या जयपूरमधील एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील आहे. तिचे वडील जयपूरमधील मोठे उद्योजक आहेत.

२०१७ मध्ये अदितीने फेमिना मिस इंडिया स्पर्धेत फायनलिस्ट म्हणून मजल मारली होती. त्यानंतर २०१८ मध्ये तिने 'मिस दिवा' चा किताब जिंकून मॉडेलिंग क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. तिने 'मिस सुपरनॅशनल' सारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

ईशान आणि अदितीच्या अफेअरच्या चर्चा खऱ्या अर्थाने २०१९ च्या आयपीएल दरम्यान सुरू झाल्या. मुंबई इंडियन्सच्या सामन्यात स्टँडमध्ये बसलेली अदिती कॅमेऱ्यात कैद झाली आणि सोशल मीडियावर ती 'मिस्ट्री फॅनगर्ल' म्हणून रातोरात व्हायरल झाली. त्यानंतर इन्स्टाग्रामवर एकमेकांच्या फोटोंना लाईक करणे आणि रोमँटिक कमेंट्स यामुळे त्यांच्या नात्याची चर्चा अधिकच गडद झाली होती.

अदिती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिची फॅशन सेन्स आणि स्टाईल चाहत्यांना भुरळ घालते. ईशान किशनच्या कठीण काळात आणि यशाच्या शिखरावर असतानाही ती नेहमीच खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली आहे. आता ईशानच्या आजोबांनी हिरवा कंदील दिल्यानंतर, हे कपल लवकरच अधिकृत घोषणा करेल अशी शक्यता आहे.