Join us  

Who is Ayush Badoni?, IPL 2022 : २० लाखांच्या खेळाडूने कोट्यवधींच्या गोलंदाजांना चोपले; पदार्पणात अर्धशतक झळकावून अनेक विक्रम मोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 9:57 PM

Open in App
1 / 6

IPL 2022 T20 Match LSG vs GT Live Score card Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या आजच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सच्या ( Lucknow Super Giants' ) २२ वर्षीय आयूष बदोनीने ( Ayush Badoni) हवा केली. गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) विरुद्धच्या लढतीत पदार्पणातच त्याने वादळी खेळी करून अनेक विक्रमांना गवसणी घातली.

2 / 6

४ बाद २९ अशी लखनौची अवस्था असताना कर्णधार लोकेश राहुलने अनुभवी कृणाल पांड्याला मागे ठेऊन आयूष बदोनीला फलंदाजीला पाठवले. त्याचा हा निर्णय सर्वांना बुचकळ्यात टाकणारा होता, परंतु आयूषने सुरुवातीला सावध खेळ करून नंतर दमदार फटकेबाजी केली.

3 / 6

जानेवारी २०२१मध्ये त्याने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि दिल्लीसाठी तो केवळ ५ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे. आयूष बदोनीला आयपीएल मेगा ऑक्शन २०२२ मध्ये दिल्लीने २० लाखांत ताफ्यात घेतले. २०१८मध्ये त्याने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध २८ चेंडूंत ५२ धावांची खेळी केली होती. तेव्हा तो प्रथम चर्चेत आला.

4 / 6

आयपीएल पदार्पणात ६व्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन अर्धशतक झळकावणारा बदोनी हा पहिलाच फलंदाज ठरला. त्याने ४१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावा केल्या. राशिद खान व ल्युकी फर्ग्युसन सारख्या अनुभवी गोलंदाजांना त्याने आत्मविश्वासाने षटकार खेचले.

5 / 6

या खेळीनंतर तो म्हणाला, मी धावांकडे पाहतच नव्हतो. मला माझा नैसर्गिक खेळ करायचा होता आणि त्यामुळे मला अर्धशतकाकडेही लक्ष नव्हते. सुरुवातीला मी थोडा नर्व्हस झालेलो, परंतु पहिला चौकार खेचला अन् सूर गवसला. काल मी रात्रभर झोपू शकलो नाही.

6 / 6

पदार्पणात ५०+ धावा करणारा आयूष हा ९वा भारतीय ठरला. यापूर्वी स्वप्निल आसनोडकर ( २००८), गौतम गंभीर ( २००८), शिवामाकृष्णन विद्युत ( २००८), शिखर धवन ( २००८), श्रीवत्स गोस्वामी ( २००८), अंबाती रायुडू ( २०१०), केदार जाधव ( २०१०), देवदत्त पडिक्कल ( २०२०) यांनी हा पराक्रम केला आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२लखनौ सुपर जायंट्सगुजरात टायटन्स
Open in App