IPLच्या इतिहासात सर्वाधिक नो-बॉल कोणी टाकले...?; यादीत ५ भारतीय गोलंदाजांचा समावेश

आयपीएलमध्ये फलंदाजाने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केल्यानंतर अनेकदा गोलंदाज दबावाखाली येतो आणि वाइड- नो बॉल टाकतो.

आयपीएल २०२३ सुरू होऊन ५ दिवस झाले आहेत. या सामन्यात आतापर्यंत अनेक रोमांचक सामने झाले. अनेक फलंदाजांनी चांगली फटकेबाजी केली, तर काही गोलंदाजांनी फलंदाजांना आपल्या तालावर नाचवत विकेट्स मिळवल्या.

आयपीएलमध्ये फलंदाजाने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात ल्याकेनंतर अनेकदा गोलंदाज दबावाखाली येतो आणि वाइड- नो बॉल टाकतो. आज आम्ही तुम्हाला अशा गोलंदाजांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आयपीएलच्या इतिहासात सर्वधिक नो बॉल टाकले आहेत. या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचाही समावेश आहे.

उमेश यादव हा आयपीएलमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकणारा गोलंदाज आहे. उमेश यादवने १३४ सामन्यात एकूण २४ नो बॉल टाकले आहेत. उमेश यादव सध्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो.

आयपीएलमध्‍ये सर्वाधिक नो बॉल टाकणारा दुसरा गोलंदाज एस. श्रीशांत आहे. श्रीशांतने आयपीएलच्या ४४ सामन्यांमध्ये २३ वेळा नो बॉल फेकण्याचा पराक्रम केला आहे. त्याने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो कोणत्याही आयपीएल संघाचा भाग नाही.

तिसऱ्या क्रमांकावर असा गोलंदाज आहे ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. खरं तर, नो बॉल टाकणाऱ्यांच्या यादीत जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही समावेश आहे. त्याने आतापर्यंत ८२ सामन्यांत २१ नो बॉल टाकले आहेत.

जसप्रीत बुमराहसह इशांत शर्माही तिसऱ्या स्थानावर आहे. इशांत शर्माने ८९ सामन्यांत २१ वेळा नो बॉल टाकले आहे.

या यादीत फिरकी गोलंदाज अमित मिश्राचाही समावेश आहे. अमित मिश्राने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण २० नो बॉल टाकले आहेत. तो आतापर्यंत आयपीएलमध्ये १४७ सामने खेळला आहे.

सर्वोत्तम वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १२२ सामने खेळले आहेत. यादरम्यान मलिंगाने १८ वेळा नो बॉल फेकले आहेत.