रवी शास्त्रींवर बॉलिवूड अभिनेत्रीचं होतं अफाट प्रेम; एका मस्करीनं तुटलं नातं?

क्रिकेटपटू आणि बॉलिवूड हे नातं फार जूनं आहे. त्यामुळे क्रिकेटपटूच्या आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या नावांची चर्चा नेहमी रंगली आहे. पण, त्यातील काही पूर्ण झाल्या, तर काही अपुऱ्या राहिल्या. टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या लव्ह स्टोरीबाबत जाणून घेणार आहे.

80च्या दशकात रवी शास्त्री यांच्या मोठा फॅन फॉलोअर्स होता. एखाद्या बॉलिवूड स्टार सारखेच रवी शास्त्री त्याकाळी होते.

त्यांच्या या लुकवर बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंह फिदा झाली होती. अमृता आणि रवी एका मॅगझिन कव्हर पेजवर सोबत दिसले होते.

त्या फोटोशूट दरम्यानच दोघ एकमेकांच्या प्रेमात पडले, असे सांगितले जाते. त्यानंतर अमृता क्रिकेट सामना पाहण्यासाठी स्टेडियमवरलाही जाऊ लागली.

या दोघांनी 1986मध्ये साखरपुडाही केला होता. पण, त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. या दोघांचं नातं एका मस्करीनं तुटलं होतं, असा दावा त्यावेळी केला गेला.

विनोद खन्ना यांच्यासोबत नातं सुरू होणार असल्याची मस्करी अमृतानं केली होती. त्यानंतर रवी शास्त्री नाराज झाले होते. पण, या वृत्ताला दुजोरा देणारे पुरावे नाही.

रवी शास्त्री यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की,''त्यांना कोणत्याही अभिनेत्रीशी विवाह करायचा नाही, कारण होणाऱ्या पत्नीनं कुटुंबाला प्राधान्य दिले पाहीजे, करिअरला नाही.''

अमृतानेही करिअरमुळे हे नातं पुढे टिकू शकत नाही, असं सांगितलं होतं.