तो मैदानात घुसला, विराट कोहलीला भेटला आणि त्याचं मन जिंकलं; पाहा एका चाहत्याची ग्रेट-भेट...

ही घटना घडली ती इंदूरमध्ये. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात.

एका चाहत्याने आपल्या अंगावर विराटचे नाव लिहिले होते. अचानक हा चाहता आपल्या आसनावरून उठला. समोर असलेली मोठी जाळी त्याने ओलांडली.

ही जाळी ओलांडत असताना तो पडणार होता, पण थोडक्यात वाचला. जर तो पडला असता तर त्याला नक्कीच बर मार बसला असता आणि त्याच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकला असता.

जाळीवरून उडी मारून हा चाहता थेट मैदानात पोहोचला. मैदानात भारतीय संघ एकत्रितपणे उभा होता.

हा चाहता धावत भारतीय संघावर पोहोचला. तिथे उभ्या असलेल्या कोहलीला तो भेटला

त्यावेळीच काही सुरक्षा रक्षकांनी मैदानात धाव घेतली आणि त्या चाहत्याची धरपकड करायला त्यांनी सुरुवात केली.

यावेळी कोहलीने या सुरक्षा रक्षकांना थांबवले आणि त्या चाहत्याला शांतपणे घेऊन जाण्यास सांगितले.