आयपीएलमध्ये लाखो कमावणाऱ्या रिंकू सिंगच्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती आहे माहित्येय?

IPL 2023 : रिंकू सिंग ( Rinku Singh) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये एक ब्रँड झाला आहे. काल गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने सलग ५ षटकार खेचून कोलकाता नाइट रायडर्सला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

GT चा कर्णधार राशीद खानने हॅटट्रिक घेताना मॅच फिरवली. ६ चेंडूंत २९ धावा हव्या असताना KKR हा सामना जिंकेल, असे कोणालाही वाटले नव्हते. रिंकू सिंगला उमेश यादवने एक धाव घेत स्ट्राईक दिली. त्यानंतर सलग पाच षटकार खेचले अन् KKRला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

रोहित शर्मा, रणवीर सिंग, KKR संघमालक शाहरुख खान, त्याची कन्या सुहाना खान, अभिनेत्री अनन्या पांडे... आदी सेलिब्रेटिंनी रिंकू सिंगचे तौंडभरून कौतुक केले. रिंकू सिंग अत्यांत गरिबीतून वर आला आहे. त्याचे वडील घरोघरी सिलेंडर पोहोचवतात. दोन भाऊही साधी नोकरी करतात. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या रिंकूच्या कुटुंबाची कमाई किती आहे, जाणून घेऊया?

रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते.

रिंकू सिंगचा सध्याचा आयपीएल पगार ५५ लाख रुपये आहे. २०१८ ते २०२१ या कालावधीत रिंकू सिंगचा पगार ८० लाख रुपये होता. २०२२ मध्ये रिंकू सिंग रिलीज झाला आणि त्यानंतर KKR ने या बॅट्समनला ५५ लाख रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले.

रिंकू सिंगने आतापर्यंत १८ IPL इनिंग्समध्ये २४.९३ च्या सरासरीने ३४९ धावा केल्या आहेत. २०२२ मध्ये रिंकूने ७ सामन्यांत ३४.८० च्या सरासरीने १७४ धावा केल्या होत्या. यंदाही या खेळाडूने दोन सामने जिंकून दिले आहेत.