Join us  

Shimron Hetmyer: क्रिकेटर फेसबुकवर पडला प्रेमात! सततच्या मेसेजने क्रशला बनवलं 'जीवनसाथी'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 7:27 PM

Open in App
1 / 7

सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून प्रेमविवाह केल्याची अनेक प्रकरणे समोर येत असतात. वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायरची प्रेम कहाणी देखील अशीच आहे.

2 / 7

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिमरॉनच्या प्रेमाची सुरुवात फेसबुकवरून झाली होती. सुरुवातीला शिमरॉनच्या मेसेजला त्याच्या क्रशने रिप्लाय दिला नव्हता. हेटमायरने याबाबत एका मुलाखतीत खुलासा केला होता.

3 / 7

रिप्लाय आला नाही तरी त्याने सातत्याने मेसेज करणे सुरूच ठेवले आणि मॉडेल निर्वाणीला हेटमायरने आपले जीवनसाथी बनवले. शिमरॉनने 2019 मध्ये निर्वाणीला प्रपोज केले आणि त्यानंतर लग्न केले.

4 / 7

शिमरॉन हेटमायरने सांगितले होते की, तो निर्वाणीच्या डोळ्यांच्या प्रेमात पडला होता. हेटमायरची पत्नी निर्वाणीचा स्वभाव त्याला आकर्षित करतो असे हेटमायरने सांगितले.

5 / 7

2022 मध्ये निर्वाणीने मुलाला जन्म दिला. या कारणास्तव शिमरॉन हेटमायरनेही आयपीएलमधून सुट्टी घेतली होती. आयपीएल 2022 मध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट होती.

6 / 7

शिमरॉन हेटमायरने आतापर्यंत आयपीएलमध्ये 46 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 44 सामन्यांमध्ये 30 च्या सरासरीने 831 धावा केल्या आहेत.

7 / 7

हेटमायरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्याने कसोटीतील 30 डावांत 838 धावा, वन डे सामन्यातील 44 डावांत 1447 धावा आणि ट्वेंटी-20 मधील 42 डावांत 797 धावा केल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 5 शतकांची नोंद आहे.

टॅग्स :वेस्ट इंडिजआंतरराष्ट्रीय क्रिकेटऑफ द फिल्डदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट
Open in App