Join us  

इंग्लंडमध्ये क्रिकेटला सुरुवात; वेस्ट इंडिज खेळाडूंच्या 15 षटकांत 1 बाद 29 धावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 5:28 PM

Open in App
1 / 10

जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा संघ ऐतिहासिक कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला. विंडीजच्या खेळाडूंनी 14 दिवसांच्या क्वारंटाईनची प्रक्रियाही पूर्ण केली असून आजपासून इंग्लंडमध्ये क्रिकेटला सुरुवात झाली.

2 / 10

कोरोना व्हायरसमुळे मागील अडीच महिन्यांपासून क्रिकेट स्पर्धांना ब्रेक लागला होता. इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात होणार आहे.

3 / 10

या मालिकेला जाण्यापूर्वी विंडीजच्या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे आता इंग्लंड दौऱ्यावर जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला.

4 / 10

8 जुलैपासून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात 8, 16 आणि 24 जुलैला क्रिकेट सामने होणार आहेत.

5 / 10

या दौऱ्यासाठी विंडीजनं 14 सदस्यीय संघ जाहीर केला. डॅरेन ब्राव्हो, किमो पॉल आणि शिमरोन हेटमायर यांनी इंग्लंड दौऱ्यावर येण्यास नकार दिल्याचे विंडीज बोर्डानं सांगितले. जेसन होल्डरच्या नेतृत्वाखील विंडीज संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

6 / 10

संघ - जेसन होल्डर ( कर्णधार), जेर्मेन ब्लॅकवूड, एन. बोनर, क्रेग ब्रॅथवेट, एस ब्रुक्स, जॉन कॅम्बेल, रोस्टन चेस, रहकीम डॉवरीच, चेमार होल्डर, शे होप, अल्झारी जोसेफ, रेयमन रेईफर, केमार रोच.

7 / 10

14 दिवसांच्या क्वारंटाईननंतर वेस्ट इंडिजचे खेळाडू मंगळवारी मैदानावर उतरले. त्यांच्यात तीन दिवसांचा क्रिकेट सामना आजपासून सुरू झाला.

8 / 10

होल्डर एकादश आणि ब्रेथवेट एकादश अशा संघात सामना सुरू झाला. ब्रेथवेट एकादशनं पहिली फलंदाजी करताना 15 षटकांत 1 बाद 29 धावा केल्या आहेत.

9 / 10

10 / 10

टॅग्स :वेस्ट इंडिजइंग्लंड