Join us  

BAN vs WI Test: वेस्ट इंडिजचा ढाक्यात 'डाका'; १४० किलोच्या गोलंदाजाची कमाल, मोडला ९० वर्षांपूर्वीचा विक्रम!

By स्वदेश घाणेकर | Published: February 14, 2021 5:20 PM

Open in App
1 / 10

वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील ४०९ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा पहिला डाव २९६ धावांवर गडगडला. पण, बांगलादेशनं दुसऱ्या डावात गोलंदाजीत कमाल दाखवली आणि विंडीजला ११७ धावांवर गुंडाळले.

2 / 10

बांगलादेशसमोर विजयासाठी २३१ धावांचे माफक लक्ष्य होते. बांगलादेश हे लक्ष्य पार करून मालिका बरोबरीत सोडवतील असा विश्वास सर्वांना होता, परंतु घडले भलतेच. बांगलादेशचा दुसरा डाव २१३ धावांवर गडगडला अन् विंडीजनं १७ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला.

3 / 10

विजयासाठी ४३ धावांची गरज असताना बांगलादेशचा ९वा फलंदाज माघारी परतला. मेहदी हसन व अबू जायेद यांनी संघर्ष दाखवला, पण त्यांना विजय मिळवण्यासाठी १७ धावा कमी पडल्या.

4 / 10

विंडीजचा १४० किलो वजनाचा गोलंदाज रहकिम कोर्नवॉल ( ७४/५ व १०५/४) यानं दोन्ही डावांत मिळून ९ विकेट्स घेत विजयात मोठा वाटा उचलला. त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

5 / 10

१९५६नंतर प्रथमच वेस्ट इंडिजच्या फिरकी गोलंदाजांनी डावात सर्वाच्या सर्व १० विकेट्स घेतल्या. कोर्नवॉल ( ४), जोमेल वॉरिकन ( ३) आणि क्रेग ब्रॅथवेट ( ३) यांनी दुसऱ्या डावात कमाल केली. याआधी १९५० साली ओल्ड ट्रॅफर्ड व ओव्हल, १९५४ साली जॉर्जटन व १९५६साली ख्राईस्टचर्च येथे डावात फिरकीपटूंनी दहा विकेट्स घेतल्या होत्या.

6 / 10

२०१२नंतर वेस्ट इंडिजने प्रथमच आशिया खंडात २+ सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवला. २०१२/१३मध्ये त्यांनी बांगलादेशलाच २-० असे पराभूत केले होते. या कालावधीत बांगलादेशनं घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या संघांचा सामना केला.

7 / 10

वेस्ट इंडिजचा हा धावांच्या बाबतीत दुसरा क्लोज विजय ठरला. यापूर्वी त्यांनी १९९३मध्ये अॅडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियावर १ धावेनं विजय मिळवला होता. १९३१साली सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियावर त्यांनी ३० धावांनी विजय मिळवला होता आणि तो विक्रम आज मोडला गेला.

8 / 10

9 / 10

10 / 10

टॅग्स :वेस्ट इंडिजबांगलादेश