Join us  

सुरेश रैनानं केलं बाळाचं बारसं; जाणून घ्या मुलाचं नाव काय ठेवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 3:52 PM

Open in App
1 / 11

भारतीय संघाचा फलंदाज सुरेश रैना आणि त्याची पत्नी प्रियांका यांच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला. सोमवारी त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली. या कपलला 2016मध्ये मुलगी झाली होती आणि तिचं नाव गार्सिया असं ठेवण्यात आले होते.

2 / 11

त्यानंतर 2020मध्ये त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. कोरोना व्हायरसच्या गंभीर वातावरणात या बातमीनं रैनाच्या चाहत्यांना आनंदाची बातमी मिळाली.

3 / 11

कोरोना व्हायरमुळे सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्सने रैनाच्या कुटुंबीयातील नव्या सदस्याचे स्वागत केले आहे.

4 / 11

सुरेश आणि प्रियंका हे बालपणीचे मित्र. लहानपणी ते एकाच कॉलनीत राहायचे. प्रियंकाचे कुटुंब दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले आणि या दोघांचा संपर्क तुटला.

5 / 11

प्रियंकाचे बाबा हे सुरेशचे शाळेमध्ये क्रीडा शिक्षक होते, तर या दोघांच्या आई या चांगल्या मैत्रिणी होत्या. बराच काळ सुरेश आणि प्रियंका हे संपर्कात नव्हते. पण २००८ साली या दोघांनी विमानतळावर पुन्हा एकदा भेट झाली.

6 / 11

त्यावेळी सुरेश आयपीएलसाठी बंगळुरुला जात होता, तर प्रियंका ही नेदरलँड्सला आपल्या जॉबसाठी चालली होती. तेव्हा या दोघांचे बोलणे झाले.

7 / 11

सुरेश जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये होता तेव्हा त्याच्या आईने त्याला कॉल करून तुझे लग्न ठरवल्याचे सांगितले.

8 / 11

रैनाने यावेळी आईला विचारले की, ती मुलगी आहे तरी कोण? त्यावेळी आईने सुरेशला प्रियंकाचे नाव सांगितले.

9 / 11

आपले लग्न प्रियंकाबरोबर झाल्याचे समजताच सुरेशने तिला फोन केला आणि ही माहिती दिली.

10 / 11

३ एप्रिल २०१५ या दिवशी सुरेश आणि प्रियंका यांचे लग्न झाले. सोमवारी या दाम्पत्याच्या घरी पुन्हा पाळणा हलला. सुरेश रैनानं नव्या सदस्याचं बारसंही केलं.

11 / 11

रैनानं मुलाचं नाव रिओ असं ठेवलं आणि चेन्नई सुपर किंग्सनेही त्याचं स्वागत केले.

टॅग्स :सुरेश रैनाचेन्नई सुपर किंग्स