Join us  

Wasim Jafferचा विक्रम, Ranji Trophy स्पर्धेत हा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 1:29 PM

Open in App
1 / 11

विदर्भ संघाकडून खेळणाऱ्या वासमी जाफरनं रणजी करंडक स्पर्धेत मंगळवारी आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. केरळ विरुद्धच्या सामन्यात जाफरनं हा विक्रम केला. रणजी स्पर्धेत हा विक्रम करणारा जाफर हा पहिलाच खेळाडू ठरला. विशेष म्हणजे महान फलंदाज सचिन तेंडुलकर या विक्रमाच्या आसपासही नाही.

2 / 11

विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या विदर्भ विरुद्ध केरळ या सामन्यात जाफरनं रणजी करंडक स्पर्धेत 12000 धावांचा पल्ला पार केला. रणजी स्पर्धेत हा पल्ला पार करणारा जाफर हा पहिलाच खेळाडू आहे. त्याच्या नावावर 150 रणजी सामने आहेत आणि हाही विक्रम करणारा तो एकमेव फलंदाज आहे

3 / 11

रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक धावांच्या यादीत मुंबईचा अमोल मुझुमदार दुसऱ्या स्थानावर येतो. 1993/94 ते 2013/14 हा काळ गाजवणाऱ्या या प्रतिभावान खेळाडूला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानं मुंबईसह आसाम व आंध्र संघाचे प्रतिनिधित्व करताना 9202 धावा केल्या.

4 / 11

मध्य प्रदेशच्या देवेंद्र बुंदेलानं 1995/96 ते 2017/18 हा काळ गाजवला. त्याच्या नावावर 9201 धावा आहेत.

5 / 11

दिल्ली. जम्मू आणि काश्मीर संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिथून मन्हासच्या नावावर 8554 धावा आहेत. त्यानं 1997/98 – 2016/17 या कालावधीत या धावा केल्या.

6 / 11

भारतीय संघाचा माजी खेळाडू हृषिकेश कानेटकर या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. 1994/95 – 2013/14 या कालावधीत त्यानं महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान संघाचे प्रतिनिधित्व करताना 8059 धावा केल्या.

7 / 11

सुब्रमणीयम बद्रीनाथनं 2000/01 – 2016/17 या कालावधीत तामीळनाडू, विदर्भ आणि हैदराबाद संघांचे प्रतिनिधित्व करातना 7850 धावा केल्या.

8 / 11

पंजाब व हरयाणा संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अमरजीत कायपीनं 1980/81 – 1999/00 या कालावधीत 7623 धावा केल्या.

9 / 11

पंजाबच्याच पंकज धर्मानी यानं 1992/93 – 2010/11 या कालावधीत 7621 धावा केल्या.

10 / 11

सौराष्ट्रचा शितांषू कोटकनं 1992/93 – 2013/14 या कालावधीत 7607 धावा केल्या.

11 / 11

ओदिशा, राजस्थान व हिमाचल प्रदेश यांचे प्रतिनिधित्व करताना रश्मी पारिडानं 1994/95 – 2014/15 या कालावधीत 7516 धावा केल्या.

टॅग्स :रणजी करंडक