Join us  

पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंना मिळते जेवढी रक्कम, तेवढा विराट कोहलीचा वर्षाचा पगार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 3:00 PM

Open in App
1 / 9

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ( पीसीबी) नुकताच त्यांच्या 21 खेळाडूंचा सेंट्रल करार जाहीर केला. बाबर आझम, अझर अली आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना सर्वाधिक पगाराच्या पंक्तित बसवण्यात आले आहे.

2 / 9

पीसीबीनं जाहीर केलेल्या नव्या करारात काहींना बढती मिळाली, तर काहींना आपलं स्थान गमवावं लागलं. अनेक नवीन चेहरेही या 21 खेळाडूंच्या यादीत दिसले.

3 / 9

पण, पाकिस्तानच्या या 21 खेळाडूंना PCB कडून मिळणारा एकत्रित पगार हा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या वर्षभराच्या पगारा इतका आहे.

4 / 9

यावरूनच बीसीसीआय ही किती श्रीमंत क्रिकेट संघटना आहे हे स्पष्ट होते आणि म्हणूनच टीम इंडियाविरुद्ध खेळण्यासाठी पाकिस्तान उतावळे आहेत.

5 / 9

पीसीबीनंही A, B आणि C अशा तीन विभागांत खेळाडूंची विभागणी केली आहे. त्यानुसार खेळाडूंना पगार दिला जाणार आहे.

6 / 9

A विभागातील खेळाडूंना महिन्याला 5 लाख 16,489 आणि वर्षाला 61 लाख 97,879 इतका पगार दिला जातो. B विभागातील खेळाडूंना महिन्याला 3 लाख 52,152 आणि वर्षाला 42 लाख 26,358 इतका पगार मिळतो. c गटातील खेळाडूंना वर्षाला 2 लाख 58,320 आणि वर्षाला 30 लाख 99,319 इतका पगार दिला जातो.

7 / 9

बीसीसीआयनं A+, A, B आणि C अशा चार विभागांत विभागणी केली आहे. त्यानुसार A+ गटातील खेळाडूला वर्षाला 7 कोटी पगार दिला जातो. A, B आणि C विभागातील खेळाडूंना अनुक्रमे 5, 3 आणि 1 कोटी पगार दिला जातो.

8 / 9

पीसीबीच्या A विभागात बाबर आझम, अझर अली आणि शाहिन शाह आफ्रिदी यांचा समावेश आहे. अन्य विभागातील सर्व खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या पगाराची बेरीज केल्यास ती जवळपास 7 कोटी 52 लाख 16,982 इतकी होते.

9 / 9

विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा बीसीसीआयनं A+ विभागात समावेश केला आहे आणि या प्रत्येकाला वर्षाला 7 कोटी पगार दिला जातो.

टॅग्स :पाकिस्तानविराट कोहलीरोहित शर्माजसप्रित बुमराहबीसीसीआय