Join us  

रोहित शर्माला उप कर्णधारपदावरून हटवा; विराट कोहलीनं निवड समितीसमोर ठेवला होता प्रस्ताव!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 10:13 AM

Open in App
1 / 6

विराट कोहलीनं ( Virat Kohli) ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर ( T 20 World Cup) टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. वाढत्या वर्कलोडमुळे हा निर्णय घेत असल्याचे विराटनं स्पष्ट केले. पण, भविष्यात वन डे व कसोटी संघाच्या कर्णधारपदावर तो कायम राहणार आहे आणि ट्वेंटी-२०त फक्त फलंदाज म्हणून आपली भूमिका बजावणार आहे.

2 / 6

विराटनंतर ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे जाईल, अशी चर्चा आतापासूनच सुरू आहे. पण, याच रोहितला उपकर्णधारपदावरून हटवण्यासाठी विराटनं निवड समितीसमोर प्रस्ताव ठेवला होता, असे धक्कादायक वृत्त समोर येत आहे. मात्र, विराटचा हा डाव त्याच्यावरच उलटला.

3 / 6

'भाषा' या न्यूज एजंसीनं दिलेल्या वृत्तानुसार विराटच्या या निर्णयामागे एक मोठं कारण आहे. एजंसीनं सांगितलं की,''विराटसोबत संवादाची समस्या आहे. महेंद्रसिंग धोनीच्या खोलीचा दरवाजा २४ तास उघडा असायचा. त्याच्याकडे खेळाडू कधीही संवाद साधायला जाऊ शकत होते. त्याच्यासोबत व्हिडीओ गेमही खेळायचे आणि क्रिकेटवर चर्चाही करायचे. पण, मैदानाबाहेर विराटची संपर्क साधणे खूपच अवघड होत होते.''

4 / 6

त्याचसोबत विराटनं निवड समितीसमोर रोहितला उप कर्णधार पदावरून हटवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. विराटच्या मते ३४ वर्षांच्या रोहितच्या जागी युवा खेळाडूला ही जबाबदारी द्यायला हवी. विराटला रिषभ पंत किंवा लोकेश राहुल यांच्यापैकी एकाला उपकर्णधार बनवायचे होते, असेही सूत्रांचा हवाला देत एजंसीनं म्हटलं आहे.

5 / 6

''बीसीसीआयला विराटची ही पद्धत आवडली नाही. विराटला उत्तराधिकारी नकोय, असा समज त्यांनी केला.'' विराटनंतर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद रोहितच्याच गळ्यात जाणार हे निश्चित आहे. अशात रिषभ, लोकेश व जसप्रीत बुमराह यांच्याकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी जाऊ शकते.

6 / 6

दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएल २०२१ जिंकण्यात यशस्वी झाला, तर पंत टीम इंडियाच्या उप कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर असेल.''पंत हा प्रबळ दावेदार आहे, परंतु लोकेशकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जसप्रीतही सप्राईज पॅकेज ठरू शकतो,''असेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :विराट कोहलीरोहित शर्माबीसीसीआय
Open in App