Virat Kohli Record as a Test captain: बंदा ये बिनधास्त है! भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार; विराट कोहलीच्या विक्रमानं विरोधकही झालेत गपगार

Virat Kohli Record as a Test captain: ७ वर्षांच्या या कर्णधारपदाच्या प्रवासात भारतीय संघाला त्यानं आयसीसी क्रमवारीत ७व्या क्रमांकावरून थेट अव्वल क्रमांकावर आणून बसवलं. म्हणूनच या यशात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या प्रत्येकाचे विराटनं आभार मानले.

Virat Kohli Record as a Test captain: दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पराभव टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला एवढा जिव्हारी लागेल याचा विचारही कुणी केला नसावा... तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी विजय मिळवून आफ्रिकेनं मालिका २-१ अशी खिशात घातली आणि २४ तासांच्या आत विराट कोहलीनं कसोटी संघाचेही कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली.

७ वर्षांच्या या कर्णधारपदाच्या प्रवासात भारतीय संघाला त्यानं आयसीसी क्रमवारीत ७व्या क्रमांकावरून थेट अव्वल क्रमांकावर आणून बसवलं. म्हणूनच या यशात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या प्रत्येकाचे विराटनं आभार मानले.

मागील पाच महिन्यांत विराटनं त्याच्या चाहत्यांना धक्क्यांमागून धक्के दिले आहेत. इंडियन प्रीमिअर लीगमधील संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद, त्यानंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद त्याने सोडले. त्यानंतर वन डे संघाच्या कर्णधारपदावरून त्याला हटवण्यात आले आणि आज त्यानं कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडले.

भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून विराटचे नाव सुवर्णाक्षरानं लिहिलं गेलं आहे. त्यानं कसोटी संघाचे कर्णधारपद हाती घेतलं, तेव्हा भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत ७व्या क्रमांकावर होता आणि आज जेव्हा त्यानं ही जबाबदारी सोडली तेव्हा भारत अव्वल स्थानावर आहे. ( Virat Kohli took over the Test captaincy when India were ranked 7th and steps down when India are ranked No.1.)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा कर्णधार म्हणून विराटनं २१३ पैकी १३५ सामने जिंकले आहेत. त्यात त्यानं ५९.९२च्या सरासरीनं १२,८८३ धावा केल्या आहेत आणि त्यात ४१ शतकांचा समावेश आहे.

कसोटी संघाचा कर्णधार म्हणून त्याचा फलंदाजीतील विक्रम पाहता. त्यानं ११३ डावांमध्ये ५४.८०च्या सरासरीनं ५८६४ धावा केल्या आहेत आणि त्यात २० शतकं व १८ अर्धशतकांचा समावेश आहे.

त्याच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर खेळलेल्या ११ पैकी ११ कसोटी मालिका भारतानं जिंकल्या आहेत. त्याशिवाय त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज येथे कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून विराट अव्वल स्थानी आहे. त्यानं ६८ पैकी ४० कसोटी सामने जिंकले आहेत. Virat Kohli is India’s most successful Test captain. महेंद्रसिंग धोनीनं ६० पैकी २७ आणि सौरव गांगुलीनं ४९ पैकी २१ सामने जिंकले आहेत.

कसोटी संघाचा कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये ग्रॅमी स्मिथ ( २५ शतकं) याच्यानंतर विराट कोहली २० शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर रिकी पाँटींग ( १९), अॅलन बॉर्डर ( १५), स्टीव्ह स्मिथ ( १५) व स्टीव्ह वॉ ( १५) यांचा क्रमांक येतो.