विराट कोहली 'मुंबई इंडियन्स'मध्ये येणार? आधी आकाश, आता नीता अंबानींसोबत फोटो, चर्चांना उधाण

Virat Kohli Mumbai Akash Ambani Nita Ambani Indians Viral Photos IPL 2024 MI vs RCB: विराट कोहलीची दमदार फलंदाजी पाहून तो आपल्या संघातून खेळावा असं प्रत्येक संघाला वाटत असतं.

Virat Kohli Mumbai Akash Ambani Nita Ambani Indians Viral Photos IPL 2024 MI vs RCB: टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली हा एक प्रतिभावान फलंदाज म्हणून सर्वत्र परिचित आहे. विराटने आत्तापर्यंत भारतीय संघाला अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. RCBच्या संघासाठीही विराटने अनेकदा मोठ्या खेळी करून दाखवल्या आहेत.

विराटच्या खेळाची प्रतिभा इतकी आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही अनेक विरोधी संघांना विराट आपल्या संघाकडून खेळावा, असे वाटत असते. कामगिरीतील सातत्यामुळे विराट कायमच क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातल्या ताईत बनतो.

सध्याही विराट IPL 2024मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. पण यापेक्षा विराटच्या सध्या दोन वेगळ्या व्हायरल फोटोंमुळे चर्चेत आहे. विराट कोहली भविष्यात मुंबई इंडियन्सच्या जर्सी मध्ये दिसणार का अशा चर्चांना उधाण आले आहे.

सर्वात आधी विराट आकाश अंबानींशी चर्चा करतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच फॅन्समध्ये विविध तर्क वितर्कांना उधाण आले. काही फॅन्सने असाही अंदाज बांधला की IPL 2025मध्ये विराट कोहली मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसू शकतो.

हा फोटो एका वेगळ्या कारणामुळेही महत्त्वाचा आहे. कारण सामन्याच्या आधी रोहित शर्मा आणि आकाश अंबानी हे अचानक एका कारमधून वानखेडे स्टेडियमला आल्याचे दिसून आले होते. त्यामुळेच या चर्चांना अधिकच जोर मिळाल्याचे दिसले.

याशिवाय विराट कोहली नीता अंबानी यांच्याशी ही चर्चा करताना दिसून आला. सामन्यात बंगळुरूचा पराभव झाल्यानंतर RCBचे खेळाडू नाराज होते. त्यावेळी डगआऊटच्या जवळ मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी आणि विराट कोहली बराच वेळ चर्चा करत असल्याचे दिसून आले.

खरे पाहता एखाद्या संघमालकाने दुसऱ्या संघाच्या खेळाडूशी चर्चा करण्याची किंवा गप्पा मारण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी नीता अंबानी धोनीशी गप्पा मारताना, तसेच शाहरुख खान ऋषभ पंतशी गळाभेट घेतानाही दिसले होते.

परंतु रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवणे, हार्दिक पांड्याला अचानक कर्णधार करणे अशा गोष्टी मुंबईच्या काही चाहत्यांना रुचलेल्या नाहीत. त्यामुळे विराट कोहलीबाबत दोन फोटो व्हायरल झाल्याने चाहते वेगळ्याच शक्यतांची अपेक्षा करताना दिसत आहेत.

दरम्यान, मुंबई विरुद्धच्या सामन्यात विराटला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. जसप्रीत बुमराहने त्याला केवळ तीन धावांवर इशान किशनकरवी झेलबाद केले. त्यानंतर बंगळूरूच्या संघाने 196 धावांचा डोंगर उभारला होता पण मुंबईच्या संघाने चार षटके राखून हा सामना सहज जिंकला.