Join us  

'विराट कोहली आला पाकिस्तानच्या मदतीला'; सोशल मीडियावर रंगलीय चर्चा, See Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 3:44 PM

Open in App
1 / 10

पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि तेथे त्यांना यजमानांकडून सपाटून मार खावा लागत आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी इंग्लंडच्या संघातील सात सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् संपूर्ण संघ विलगिकरणात गेला. त्यानंतर ECBनं बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली नवा संघ जाहीर केला. नवख्या संघाकडूनही पाकिस्तानला पराभव पत्करावा लागत आहे.

2 / 10

अशात सोशल मीडियावर पाकिस्तानच्या मदतीला विराट कोहली आल्याची चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तानचा फलंदाज सौद शकिल याचा लूकपाहून ही चर्चा सुरू झाली आहे.

3 / 10

२५ वर्षीय शकिल यानं पाकिस्तानकडून फक्त दोनच वन डे सामने खेळले आहेत, परंतु तो चर्चेत आला आहे. त्याचा लूक हा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी मिळताजुळता दिसत आहे.

4 / 10

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात शकिलनं ७७ चेंडूंत ५६ धावांची खेळी करून संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला, परंतु इंग्लंडनं ५२ धावांनी सामना जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडनं २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10

टॅग्स :पाकिस्तानइंग्लंडविराट कोहली