क्रिकेटमधून ब्रेक घेणं विराट कोहलीला पडलं महागात, झालं मोठं नुकसान! संघासाठीही धोक्याची घंटा

Virat Kohli, India vs England: दुसऱ्यांदा बाबा झालेला विराट सध्या क्रिकेटपासून दूर आहे, पण त्याचा अप्रत्यक्षपणे भारतीय संघालाही फटका बसण्याची शक्यता दिसत आहे.

Virat Kohli Team India, IND vs ENG 5th Test: टीम इंडियाचा रनमशिन विराट कोहली सध्या ब्रेकवर आहे. तो नुकताच दुसऱ्यांदा बाबा झाला. आपली पत्नी अनुष्का शर्मा हिला वेळ देण्यासाठी त्याने क्रिकेटपासून काही काळ ब्रेक घेतला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विराट अद्याप एकही कसोटी खेळलेला नाही. पहिल्या दोन सामन्यांत तो खेळणार नव्हता हे त्याने आधीच स्पष्ट केले होते. पण त्यानंतर त्याने उर्वरित मालिकेतूनही माघार घेतली.

दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे विराट कोहली टीम इंडियापासून दूर आहे. मात्र, हा ब्रेक घेणे विराट कोहलीला काही अंशी नुकसानदायक ठरले आहे. तसेच, त्याचा हा ब्रेक त्याला आणि टीम इंडियाला देखील महागात पडण्याची शक्यता आहे.

आयसीसीने कसोटी फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली असून त्यात विराट कोहलीची दोन स्थानांनी घसरण झाली. ताज्या कसोटी क्रमवारीत विराट कोहली ७व्या स्थानावरून ९व्या स्थानी आला. पण खरा धोका तर पुढे आहे.

सध्या विराट ७४४ रेटिंग पॉइंट्ससह Top 10 मध्ये आहे. पण फलंदाजांच्या क्रमवारीत तो Top 10 मधून बाहेर पडण्याचा धोका आहे. पाचव्या कसोटीत तो न खेळल्यास कदाचित तो क्रमवारीत अधिक खाली घसरेल.

त्याच्या या ब्रेकचा फटका केवळ त्यालाच नव्हे तर टीम इंडियालाही बसू शकतो. एकेकाळी रँकिंगमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या टीम इंडियाचा सध्या केवळ एकच खेळाडू Top 10 मध्ये आहे. तो फलंदाज म्हणजे विराट कोहली. अशातच, विराटची क्रमवारीत घसरण झाल्यास भारताचा एकही खेळाडू Top10 मध्ये दिसू शकणार नाही.