विरुष्कानं घेतला पिकलबॉलचा आनंद; DK सह त्याच्या बायकोचीही दिसली झलक, इथं पाहा खास फोटो

विराट अनुष्कासह RCB च्या या मंडळींमध्ये दिसली नव्या खेळाची क्रेझ

विराट कोहली आणि अनुष्क शर्मा जोडीनं तुफान लोकप्रियता मिळवली आहे. आयपीएलमधील आरसीबीची मॅच असो वा टीम इंडियाचा सामना कोहली बहुतांशवेळा विराटला चीअर करताना पाहायला मिळाले आहे.

आयपीएलदरम्यान विराट-अनुष्का जोडीनं RCB च्या ताफ्यातील अन्य मंडळींसोत पिकलबॉल खेळाचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले. जोडीचे खास फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसते.

२००६ पासून पिकलबॉल खेळ भारतात खेळला जातोय. पण आता हळूहळू त्याची क्रेझ वाढताना दिसत आहे. RCB च्या ताफ्यातील खेळाडूंसह स्टाफ सदस्यांनीही या खेळाचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले.

कोहली अनुष्काशिवाय RCB कोचिग स्टाफसोबत असलेल्या दिनेश कार्तिकही या खेळात सहभागी झाल्याचे दिसून आले.

RCB नं आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केलेल्या फोटोत दिनेश कार्तिकची पत्नी दीपिका पल्लीकल हिचीही झलक पाहायला मिळते. जी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्क्वॉश खेळाडू आहे.

आरसीबीच्या ताफ्यातील जलदगती गोलंदाज भुनवेश्वर कुमार हा देखील पिकलबॉल खेळताना दिसून आले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघातील रोमारियो शेफर्ड याचा पिकलबॉल खेळतानाचा आनंद हा बघण्याजोगा असा होता.

विराट कोहलीनं पत्नी अनुष्कासह या खेळाचा आनंद घेतल्यानंतर या खेळाबद्दलची चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढली तर त्यात नवल वाटू नये.