Join us  

Glenn Maxwell's wedding party : बँड, बाजा, बाराती!; ग्लेन मॅक्सवेलच्या लग्नाच्या पार्टीत थिरकला विराट, फॅफ ड्यू प्लेसिस दिसला भारतीय वेशात, पाहा Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 3:31 PM

Open in App
1 / 12

Glenn Maxwell's wedding party : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल मागील महिन्यात भारतीय वंशाच्या विनि रमण ( Vini Raman) सोबत विवाह बंधनात अडकला. मॅक्सवेल व विनी हे दोघंही गेली अनेक वर्ष एकमेकांसोबतच आहेत आणि यंदा त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

2 / 12

3 / 12

आयपीएल २०२२ला सुरुवात होण्याआधी मॅक्सवेल व विनी यांनी ऑस्ट्रेलियन व भारतीय अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले. लग्नसोहळ्यामुळेच मॅक्सवेलला आयपीएल २०२२च्या सुरुवातीच्या काही सामन्यांत खेळता आले नव्हते. भारतात परतल्यानंतर मॅक्सवेलने बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) सहकाऱ्यांना त्याच्या लग्नाची पार्टी दिली.

4 / 12

5 / 12

मॅक्सवेल व विनी यांच्या लग्नाच्या पार्टीत RCBच्या खेळाडूंनी खूप धम्माल मस्ती केली. विराट कोहली बिनधास्त नाचताना दिसला... RCB चा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस त्याच्या कुटुंबीयांसह भारतीय पारंपरिक वेशात दिसले. फॅफचा हा फॅमिली फोटो त्याच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का होता.

6 / 12

7 / 12

२०१३ मध्ये मेलबर्न स्टार इव्हेंटमध्ये ग्लेन व विनी यांची पहिली भेट झाली. बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०२०मध्ये भारतीय पद्धतीनेच दोघांनी साखरपुडा गेला. अँचोरमॅन 2@ क्राऊन येथे त्यांची पहिली डेट झाली.

8 / 12

9 / 12

ग्लेन मॅक्सवेलनं विनीला पहिलं I Love you म्हटले... भारतीय वंशाची विनी ऑस्ट्रेलियन नागरिक आहे आणि ती मेलबर्न येथे फार्मासिस्टची प्रॅक्टीस करते.. विनी ऑस्ट्रेलियातील तामिळ कुटुंबातील आहे. व्हिक्टोरिया येथील Mentone Girls Secondary College मध्ये तिने वैद्यकिय शिक्षण पूर्ण केले.

10 / 12

11 / 12

12 / 12

टॅग्स :आयपीएल २०२२ग्लेन मॅक्सवेलविराट कोहलीएफ ड्यु प्लेसीसरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App