स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...

Vinod kambli brother: विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे ते जाणून घ्या

मुंबईच्या क्रिकेटविश्वातील चर्चेतील नाव म्हणजे विनोद कांबळी. विनोद कांबळी हा एक प्रतिभावान फलंदाज होता. सचिन तेंडुलकरशी त्याची मैत्री भारतीय क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहे.

विनोद कांबळी मध्यंतरीच्या काळात नकारात्मक गोष्टींमुळे चर्चेत होता. पण तुम्हाला माहितीये का, विनोद कांबळीला एक भाऊदेखील आहे. जाणून घेऊया, कोण आहे तो...

विनोद कांबळीला एक धाकटा भाऊ आहे. त्याचे नाव वीरू कांबळी आहे. विनोद कांबळीच्या भावाचा उल्लेख पहिल्यांदाच करण्यात आला आहे.

याआधी विनोद कांबळीच्या भावाबद्दल फारसे काही पाहिले किंवा ऐकले नव्हते. पण, आता समोर आलेल्या काही फोटो आणि व्हिडिओमुळे तो चर्चेत आला आहे.

विनोद आणि वीरू कांबळी यांचे चेहरे एकमेकांसारखे दिसतात. त्यांची शैलीही सारखीच आहे. दोन्ही भाऊ क्रिकेटचे प्रचंड मोठे चाहते आहेत.

फरक एवढाच की विनोद कांबळी हा एक प्रतिभावान डावखुरा फलंदाज होता, तर दुसरीकडे वीरू कांबळी हा उजव्या हाताचा प्रतिभावान गोलंदाज आहे.

वीरू कांबळीने दादा विनोदसोबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्याचबरोबर त्याने असा संदेशही दिला आहे की, लवकरच तो मोठ्या अॅक्शनमध्ये परतताना दिसेल.