Join us  

वरुण चक्रवर्थीची एक चूक IPL 2021ला महागात पडणार; तरीही खेळला होता दिल्लीविरुद्धचा सामना?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 6:20 PM

Open in App
1 / 8

कोरोना संकटात आयपीएलनं स्वतःचं बायो बबल तयार करून खेळाडू, सपोर्ट स्टाफ व त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवले होते. पण, सोमवारी आयपीएलच्या बायो बबलवर कोरोना स्ट्राईक झाला. KKRचे वरुण चक्रवर्थी व संदीप वॉरियर्स यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् सोमवारी RCBविरुद्ध होणारा सामना स्थगित करावा लागला.

2 / 8

त्यापाठोपाठ चेन्नई सुपर किंग्सचे (CSK) CEO कासी विश्वनाथन, गोलंदाज प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी व बस क्लिनर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

3 / 8

दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कोटला मैदानावर आयपीएलचे सामने होत आहेत आणि त्या स्टेडियमवर काम करणाऱ्या पाच ग्राऊंड्समनचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे.

4 / 8

चेन्नई सुपर किंग्सचे सर्व खेळाडू सुरक्षित आहेत, पण चक्रवर्थीच्या एका चूकीनं KKRसंघासह दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंना तव्यावर ठेवलं आहे.

5 / 8

स्पोर्ट्स तक ( Sports Tak) नं दिलेल्या वृत्तानुसार वरुण चक्रवर्थी हा त्याच्या खांद्याच्या स्कॅनसाठी स्थानिक हॉस्पिटलमध्ये गेला अन् तिथून आल्यानंतर तो क्वांरटाईनमध्ये गेला नाही आणि दुसऱ्या दिवशी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना खेळला.

6 / 8

KKRनं त्यांच्या सर्व खेळाडू व स्टाफ सदस्यांना ६ मे पर्यंत क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगितले आहे. रोज या सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. जर सर्वांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर ७ मे रोजी RCBविरुद्धचा सामना होईल, असेही स्पोर्ट्स तकनं सांगितले आहे.

7 / 8

काय असंत ग्रीन चॅनेल ( Green Channel) - आयपीएलच्या ग्रीन चॅनेल नियमानुसार खेळाडूला उपचार हवे असल्यास किंवा त्याच्या दुखापतीचं स्कॅन करायचं असल्यास त्याला एका गाडीतून ( बायो बबल मध्ये असलेल्या चालकासह), PPE किट घालून हॉस्पिटलमध्ये नेले जाते. त्यानंतर वैद्यकिय अधिकारीही PPEकिट घालूनच उपचार करतात आणि खेळाडू पुन्हा त्याच गाडीतून बायो बबलमध्ये येतो.

8 / 8

दरम्यान पॅट कमिन्सची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती, त्याच्या मॅनेजरनं दिली आहे.

टॅग्स :आयपीएल २०२१कोलकाता नाईट रायडर्सचेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्सकोरोना वायरस बातम्या