रेकॉर्ड ब्रेकर वैभव सूर्यवंशी! IPL स्पेशलिस्ट रैनासह अभिषेक, ईशान आणि ट्रॅविस हेडचा विक्रम मोडला

IPL च्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक झळकावणारे 'धुरंधर'

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशी याने आयपीएलच्या आपल्या दुसऱ्या हंगामाची सुरुवात एकदमच धमाकेदार अंदाजात केली आहे.

पाच वेळच्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना या पठ्ठ्यानं अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक झळकावले.

राजस्थानच्या संघाकडून IPL मधील दुसरे सर्वात जलद अर्धशतक ठोकताना वैभव सूर्यवंशीनं खास क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे.

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत वैभव सूर्यवंशीसह युसूफ पठाण, सुनील नरेन, निकोलस पूरन आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क यांनी १५ चेंडूत अर्धशतक झळकाल्याचा रेकॉर्ड आहे.

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत वैभव सूर्यवंशीसह युसूफ पठाण, सुनील नरेन, निकोलस पूरन आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क यांनी १५ चेंडूत अर्धशतक झळकाल्याचा रेकॉर्ड आहे.

IPL च्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम हा राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातील वैभव सूर्यवंशीचा सलामीचा जोडीदार यशस्वी जैस्वालच्या नावे आहे.

यशस्वी जैस्वाल याने २०२३ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात अवघ्या १३ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.

KL राहुलनं २०१८ च्या हंगामात पंजाबच्या संघाकडून खेळताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १४ चेंडूत अर्धशतक साजरे केले होते. सध्या तो दिल्लीच्या संघाचा भाग आहे.

या यादीत KL राहुलसह पॅट कमिन्स, रोमारियो शेफर्ड आणि यांचाही समावेश आहे. या तिघांनी फक्त १४ चेंडूत अर्धशतक झळकाल्याचा रेकॉर्ड आहे.