U19 World Cup Final: भारताची इंग्लंडविरूद्ध लढत; 'या' 5 खेळाडूंवर असेल साऱ्यांची नजर

भारतीय संघ आतापर्यंत स्पर्धेत अजिंक्य आहे. त्यामुळे इंग्लंड भारताचा विजयरथ रोखणार की भारत विजेतेपद मिळवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात आज U19 वर्ल्ड कप 2022 चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात दोन्हीकडच्या मिळून कोणत्या पाच खेळाडूंवर नजर असेल ते पाहूया...

भारतीय चाहत्यांना फायनलमध्ये कर्णधार यश धुल कडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. त्याने अवघ्या तीन सामन्यात १०६ च्या स्ट्राईक रेटने २१२ धावा केल्या आहेत.

अंगक्रीश रघुवंशी हा दमदार फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तो भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून त्याने ५६ च्या सरासरीने २७८ धावा केल्या आहेत.

भारताप्रमाणेच इंग्लंडचा कर्णधार टॉम प्रेस्ट देखील बेधडक फलंदाज आहे. त्याने ७३ च्या सरासरीने एकूण २९२ धावा केल्या आहेत.

इंग्लंडचा जेकब बेथल हा अष्टपैलू खेळाडू असून तो सामन्यात रंग भरू शकतो. त्याने ४० च्या सरासरीने २०३ धावा केल्या आहेत.

भारतीय गोलंदाज विकी ओस्तवाल याच्या कामगिरीकडे साऱ्यांचेच लक्ष असेल. विकी ने ५ सामन्यात १२ बळी टिपले आहेत.