चायनिज प्रॉडक्टही रिषभ पंतपेक्षा टिकावू, नेटिझन्स सुसाट...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियाचा यष्टिरक्षक रिषभ पंतला अपयश आले. तो केवळ चार धावा करून माघारी परतला. वर्ल्ड कप स्पर्धेतही संधी मिळूनही पंतला साजेशी कामगिरी करता आली नाही. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा वारसदार म्हणून पंतकडे पाहिले जात आहे. आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून निवड समितीनंही पंतला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या. पण, पंतच्या सततच्या अपयशानंतर धोनीला परत बोलावण्याची मागणी होत आहे. आफ्रिकेविरुद्ध सामन्यात अपयशी ठरल्यानंतर नेटिझन्सने पंतचा चांगलाच समाचार घेतला.