आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकणारे टॉप ५ गोलंदाज!

Most Dot Balls in IPL 2025: आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकणाऱ्या टॉप ५ गोलंदाजांबद्दल जाणून घेऊयात.

५) गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने आठ सामन्यात ३१ षटके टाकली आहेत आणि 226 धावा दिल्या. त्याने आतापर्यंत ८५ डॉट बॉल टाकले आहेत.

४) इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे, त्याने आतापर्यंत ९ सामन्यांत ८७ डॉट बॉल टाकले आहेत.

३) आरसीबीच्या जोश हेझलवूडने राजस्थानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने १९ वे षटक टाकले आणि फक्त १ धाव दिली. या हंगामात आतापर्यंत ९ सामन्यांमध्ये हेझलवूडने ३२.५ षटके टाकली आहेत, त्यापैकी ९३ चेंडू डॉट झाले.

२) चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने या हंगामात ९३ डॉट बॉल टाकले आहेत. त्याने ९ सामन्यांमध्ये एकूण ३२ षटके टाकली आहेत आणि २८८ धावा दिल्या आहेत.

१) गेल्या वर्षी आरसीबीकडून खेळलेला मोहम्मद सिराज या वर्षी गुजरात टायटन्सचा भाग आहे आणि तो उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यांमध्ये ३२ षटके टाकली आहेत, ज्यामध्ये त्याने ९३ डॉट बॉल टाकले आहेत.