Top 10 Buys in IPL 2022 Auction : Mumbai Indiansकडून इशान किशनला बंपर लॉटरी, मालामाल टॉप टेन खेळाडूंमध्ये सहा भारतीय

Top 10 Buys in IPL 2022 Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्सनं आज दोनच खेळाडू ताफ्यात घेतले, परंतु त्यापैकी इशान किशनसाठी त्यांनी विक्रमी किंमत मोजली. त्यामुळेच ऑक्शनच्या पहिल्या दिवशी इशान किशन हा सर्वाधिक रक्कम घेणारा खेळाडू ठरला. पाहूयात आजच्या लिलावातील टॉप १० महागडे खेळाडू...

राजस्थान रॉयल्स - प्रसिद्ध कृष्णा ( गोलंदाज ) - १० कोटी

गुजरात टायटन्स - ल्युकी फर्ग्युसन ( गोलंदाज ) -१० कोटी

लखनौ सुपर जायंट्स - आवेश खान ( गोलंदाज ) - १० कोटी

सनरायईज हैदराबाद - निकोलस पूरन ( यष्टिरक्षक) - १०.७५ कोटी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - वनिंदू हसरंगा ( अष्टपैलू ) - १०.७५ कोटी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - हर्षल पटेल ( अष्टपैलू ) - १०.७५ कोटी

दिल्ली कॅपिटल्स - शार्दूल ठाकूर ( गोलंदाज ) - १०.७५ कोटी

कोलकाता नाइट रायडर्स - श्रेयस अय्यर ( फलंदाज ) - १२.२५ कोटी

चेन्नई सुपर किंग्स - दीपक चहर ( गोलंदाज ) - १४ कोटी

मुंबई इंडियन्स - इशान किशन ( यष्टिरक्षक-फलंदाज ) १५.२५ कोटी