Join us  

भारताचा 'हा' हॉकीपटू Yo-Yo चाचणीत विराट कोहलीवर भारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 3:16 PM

Open in App
1 / 10

२०१७च्या वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापन यांनी खेळाडूंच्या तंदुरुस्तीवला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.

2 / 10

त्यानंतर टीम इंडियात निवड होण्यासाठी खेळाडूंना Yo-Yo चाचणी पास करणे अनिवार्य केले. जो खेळाडू ही चाचणी पास करेल, त्याला संघात स्थान मिळेल.

3 / 10

कर्णधार विराट कोहली हा भारताचा सर्वात तंदुरुस्त खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच युवा पिढीला विराटच्या फिटनेसचे आकर्षण आहे.

4 / 10

पण, विराटवरही Yo-Yo चाचणीत तीन खेळाडू भारी पडले आहेत. त्यापैकी एक खेळाडू हा टीम इंडियाचा हॉकीपटू आहे आणि त्याच्या तंदुरुस्तीशी विराटची तुलना होणे नाही.

5 / 10

मनीष पांडे Yo-Yo चाचणी विराटला टक्कर देतो. मैदानावरील त्याचे चापल्य हे विराटलाही मागे टाकणारे आहे आणि त्याची प्रचिती त्यानं अनेकदा दिली आहे.

6 / 10

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार कोहलीनं Yo-Yo चाचणीत १९ गुणांची कमाई केली होती. पण, मनीष पांडेचे गुण हे १९.२ इतके होते. युवराज सिंगला तेव्हा Yo-Yo चाचणी पास करता आली नव्हती.

7 / 10

मयांक डागर हे नाव अनेकांनी ऐकलेही नसेल. पण, त्यानेही २०१८च्या Yo-Yo चाचणीत १९.३ गुणांची कमाई करताना विराटसह मनीषलाही मागे टाकले होते.

8 / 10

हिमाचल प्रदेशचा हा खेळाडू इंडियन प्रीमिअर लीगमधील किंग्स इलेव्हन पंजाबचा सदस्य आहे.

9 / 10

करुण नायरचे Yo-Yo चाचणीतील गुण माहीत नसले तरी भारतीय संघाचे माजी ट्रेनर शंकर बासू यांच्यामते तो संघातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू आहे.

10 / 10

भारताच्या हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग हा या सर्वांवर भारी ठरतो. त्यानं Yo-Yo चाचणीत २१.४ गुणांची कमाई केली आहे आणि त्यानं स्वतःचा २१.३ गुणांचा विक्रम मोडलाय.

टॅग्स :विराट कोहलीयो यो चाचणी