Join us  

IPL 2020 रद्द झाल्यास MS Dhoniसह तीन खेळाडूंना मोठा फटका!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 10:00 AM

Open in App
1 / 11

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३व्या मोसमालाही या व्हायरसचा फटका बसलेला दिसत आहे.

2 / 11

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) २९ मार्चपासून सुरू होणारी स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

3 / 11

आयपीएल पुढे ढकलली असली तरी ही स्पर्धा होईल की नाही यावर अजूनही अनिश्चिततेचं सावट आहे. त्यामुळे बीसीसीआयसह फ्रँचायझी मालकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

4 / 11

पण, या आर्थिक फटक्या व्यतिरिक्त खेळाडूंच्या करिअरचा प्रश्न निर्माण झाला आहे. आयपीएल रद्द झाल्यास महेंद्रसिंग धोनीसह तीन भारतीय खेळाडूंना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

5 / 11

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी आयपीएल हाच पर्याय होता. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि निवड समिती धोनीच्या आयपीएलमधील कामगिरीवर लक्ष ठेवणार होती.

6 / 11

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. त्यामुळे टीम इंडियातील त्याचे स्थान डळमळीत झाल्याची चर्चा आहे. त्यात त्याच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आयपीएलमधून त्याला कमबॅक करण्याची संघी आहे.

7 / 11

धोनीला पर्याय म्हणून रिषभ पंतचे नाव आघाडीवर आहे. पण, संजू सॅमसन त्याला कडवी टक्कर देऊ शकतो.

8 / 11

स्थानिक क्रिकेटमध्ये संजूची बॅट चांगलीच तळपली आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर त्याची निवड करून निवड समितीनं रिषभला धोक्याचा इशाराच दिला. पण, संजूला त्यावर खरं उतरता आले नाही.

9 / 11

त्यामुळे आयपीएलमधील कामगिरी त्याला टीम इंडियात पुन्हा स्थान मिळवून देण्यात फायदेशीर ठरणारी आहे. पण, आयपीएल न झाल्यास त्याला तोटा होऊ शकतो. निवड समिती सॅमसन आणि रिषभ यांना दोघांनाही डच्चू देऊन तिसऱ्या पर्यायाचा विचार करू शकतात.

10 / 11

पृथ्वी शॉने न्यूझीलंड दौऱ्यातून वन डे संघात पदार्पण केले. परंतु त्याला ट्वेंटी-20 संघात स्थान पटकावता आलेले नाही. आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवल्यास सलामीला शिखर धवन हा सक्षम पर्याय आहे. त्यात सलामीला तिसरा पर्याय म्हणून पृथ्वीच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.

11 / 11

त्यामुळे आयपीएलमधील कामगिरी त्याला ट्वेंटी-२० संघात स्थान मिळवून देऊ शकते. पण, त्यासाठी आयपीएल होणे आणि पृथ्वीची बॅट तळपणे महत्त्वाची आहे. सलामीसाठी धवन, लोकेश राहुल आणि रोहित शर्मा हे फलंदाज आघाडीवर आहेत.

टॅग्स :आयपीएल 2020कोरोना वायरस बातम्याबीसीसीआयमहेंद्रसिंग धोनीपृथ्वी शॉ