हे आहेत जगातील असे ५ क्रिकेटपटू, ज्यांनी बदललं आपलं नाव, दोघांनी तर धर्मही बदलला

5 cricketers In The World Who Changed Their Names: सध्या टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रिकेटपटूंचे रेकॉर्ड आणि कौशल्याची क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा होत आहे. खरंतर जगातील कुठल्याही क्रिकेटपटूला आपण त्याचं नाव आणि त्याने रचलेले रेकॉर्ड यावरून ओळखतो. मात्र या क्रिकेट जगतात असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी कारकिर्दीच्या ऐन वळणावर आपलं नाव बदललं आहे. त्यातील काही क्रिकेटपटूंनी तर आपला धर्मदेखील बदलला आहे. यापैकी काही क्रिकेटपटू खालील प्रमाणे.

सध्या टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रिकेटपटूंचे रेकॉर्ड आणि कौशल्याची क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा होत आहे. खरंतर जगातील कुठल्याही क्रिकेटपटूला आपण त्याचं नाव आणि त्याने रचलेले रेकॉर्ड यावरून ओळखतो. मात्र या क्रिकेट जगतात असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी कारकिर्दीच्या ऐन वळणावर आपलं नाव बदललं आहे. त्यातील काही क्रिकेटपटूंनी तर आपला धर्मदेखील बदलला आहे. यापैकी काही क्रिकेटपटू खालील प्रमाणे.

या यादीतमधील पहिलं नाव आहे ते म्हणजे पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज असलेल्या मोहम्मद युसूफ याचं. मोहम्मद युसूफचं आधीचं नाव युसूफ योहाना असं होतं. तसेच तो कारकीर्दीतील बहुतांश वर्षे याच नावासह खेळला होता. पाकिस्तानकडून खेळलेल्या काही मोजक्या ख्रिस्ती क्रिकेटपटूंपैकी तो एक होता. मात्र २००५ मध्ये त्याने धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार केला. तसेच आपलं नाव बदलून मोहम्मद युसूफ असं नाव धारण केलं.

श्रीलंकेचा माजी फलंदाज तिलकरत्ने दिलशान याचाही नाव आणि धर्म बदललेल्या क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये समावेश आहे. तिलकरत्ने दिलशानचा जन्म एका मुस्लिम कुटुंबामध्ये झाला होता. त्याचं सुरुवातीचं नाव तवान मोहम्मद दिलशान असं होतं. त्याचे वडील मुस्लिम तर आई बौद्ध होती. मात्र आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर दिलशानने इस्लामचा त्याग करून आईचा धर्म असलेल्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तसेच नाव बदलून तिलकरत्ने मुदियानसेलागे दिलशान हे नवे नाव धारण केले.

श्रीलंकेचा माजी फिरकीपटू सूरज रणदीव याने देखील त्याचं नाव बदललेलं आहे. रणदीवचा जन्म एका मुस्लिम कुटुंबात झाला होता. तसेच त्याचं नाव मोहम्मद मार्शुक मोहम्मद सूरज असं होतं. कारकीर्दीच्या ऐन मध्यावर त्याने आपलं नाव बदलून सूरज रणदीव हे नाव धारण केलं.

अफगाणिस्तानच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या असगर अफगाण यानेही आपलं नाव बदलेललं आहे. असगरचं आधीचं नाव असगर स्टेनिकजाई असं होतं. २०१८ साली त्याने आपलं नाव बदलून नावामध्ये राष्ट्रीय ओळख अधोरेखित करण्यासाठी असगर अफगाण असं नाव स्वीकारलं.

इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज आणि विश्वविजेता कर्णधार असलेल्या जोश बलटर यानेही त्याच्या नावात किंचित बदल केला आहे. बटलर याला आधी क्रिकेट जगतात जोस बटलर या नावाने ओळखले जात असे. मात्र २०२४ मध्ये त्याने आपलं नाव बदलून आपल्या नावाचं स्पेलिंग Jos ऐवजी Josh अस केलं आहे. त्यामुळे त्याचं नाव आता जोश बटलर असं झालं आहे.