टीम इंडियाचे हे ५ दिग्गज खेळणार आपला शेवटचा वर्ल्डकप, या खेळाडूंचा आहे समावेश

Team India: आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. भारतात होत असलेली ही विश्वचषक स्पर्धा टीम इंडियामधील काही दिग्गज खेळाडूंसाठी शेवटची विश्वचषक स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे. यातील पाच प्रमुख खेळाडूंची नावं पुढील प्रमाणे.

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. भारतात होत असलेली ही विश्वचषक स्पर्धा टीम इंडियामधील काही दिग्गज खेळाडूंसाठी शेवटची विश्वचषक स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे. यातील पाच प्रमुख खेळाडूंची नावं पुढील प्रमाणे.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा ३६ वर्षांचा झाला असून, ही विश्वचषक स्पर्धा शेवटची वर्ल्डकप स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे. पुढील वर्ल्डकप हा २०२७ मध्ये खेळवला जाणार आहे. त्यावेळी रोहित शर्मा ४० वर्षांचा झालेला असेल. त्यामुळे त्या स्पर्धेत तो खेळणं थोडं कठीण आहे.

भारताच्या वेगवान माऱ्यातील प्रमुख अस्र असलेला मोहम्मद शमी हा ३२ वर्षांचा झाला आहे. त्याचीही ही स्पर्धा शेवटची विश्वचषक स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे. पुढील विश्वचषक स्पर्धा २०२७ मध्ये खेळली जाईल. त्यावेळी शमी ३६ वर्षांचा असेल. वेगवान गोलंदाज असल्याने त्या वयात फिटनेस राखणं हे शमीसाठी आव्हानात्मक असेल. त्यामुळे हीच स्पर्धा त्याची शेवटची विश्वचषक स्पर्धा ठरू शकते.

भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा ३६ वर्षांचा झाला आहे. त्याचीही ही विश्वचषक स्पर्धा शेवटची ठरू शकते. यानंतर पुढील विश्वचषक स्पर्धा ही २०२७ मध्ये होणार आहे. त्यावेळी अश्विनचं वय हे ४० वर्षे असेल. त्यामुळे त्या वयापर्यंत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो खेळत राहण्याची शक्यता कमी आहे.

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा ३४ वर्षांचा झाला आहे. त्यामुळे यावर्षी घरच्या मैदानात होणारा विश्वचषक त्याच्यासाठी शेवटचा ठरू शकतो. कारण २०२७ साली जडेजा ३८ वर्षांचा होईल. त्या वयात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये टिकून राहणं त्याच्यासाठी आव्हानात्मक असेल.

भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा ३३ वर्षांचा आहे. पुढील विश्वचषक स्पर्धेपर्यंत तो ३७ वर्षांचा होईल. त्यामुळे हीच विश्वचषक स्पर्धा भुवनेश्वर कुमारसाठी शेवटची विश्वचषक स्पर्धा ठरू शकते.