तुमच्यासारखा दुसरा होणे नाही; सचिन तेंडुलकर, शाहिद आफ्रिदीसह क्रीडा विश्वातूनही दिलीपकुमार यांना श्रद्धांजली

बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार (Tragedy King DilipKumar) यांचे निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. त्यांना खारच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. (Dilip Kumar passed away. ) दिलीप कुमार यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. यामुळे त्यांना हिंदुजामध्ये गेल्या महिन्यात दाखल करण्यात आले होते. त्यांची पत्नी सायरा बानू यांनी त्यांना हॉस्पिटलमधून घरी नेण्याची इच्छा व्यक्ती केली होती. यानुसार हॉस्पिटलने दिलीप कुमार यांना नुकताच डिस्चार्ज दिला होता. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीपकुमार यांना क्रीडा विश्वातूनही श्रद्धांजली वाहण्यात आली.

एका पर्वाचा अंत. - व्हीव्हीएस लक्ष्मण

दिलीपकुमारजी यांच्या निधनाचं वृत्त ऐकून खूप दुःख झालं. आणखी एका दिग्गजाचे निधन झाले. भारतीय चित्रपटासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. - युवराज सिंग

KPK पासून ते मुंबईपर्यंत युसूफ खान यांच्या चाहत्यांना हा मोठा धक्का आहे. तुम्ही आमच्या मनात कायम जीवंत राहणार आहात - शाहिद आफ्रिदी

तुमच्या आत्म्याला शांती मिळो दिलीपजी. तुमचासारखा दुसरा होणे नाही, भारतीय चित्रपटसृष्टीतील आपले योगदान अतुलनीय आहे आणि तुमची आठवण सदैव येत राहील.- सचिन तेंडुलकर