The View Called For A Selfie! मराठमोळ्या अजिंक्य रहाणेची पत्नीसोबत भटकंती

अजिंक्य आणि राधिकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये हे दोघे निसर्गरम्य वातावरणात तल्लीन झाल्याचे दिसते.

भारतीय संघाचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. त्याच्यापेक्षा जास्त त्याची पत्नी राधिका धोपावकर सक्रिय असते. आता या मराठमोळ्या जोडीने भटकंतीचा फोटो शेअर केला आहे.

अजिंक्य आणि राधिकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये हे दोघे निसर्गरम्य वातावरणात तल्लीन झाल्याचे दिसते.

"आम्ही असलेल्या ठिकाणच्या दृश्याने सेल्फी काढण्यासाठी भाग पाडले", अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी दिले आहे. राधिका आणि अजिंक्य यांच्या मागे असलेले निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य पाहायला मिळते.

सामन्यादरम्यान राधिका अनेकदा रहाणेला चीअर करताना प्रेक्षक गॅलरीत दिसली आहे. त्याचे फोटो, व्हिडीओ ती अपलोड करत असते.

अजिंक्य आणि राधिका यांना दोन अपत्य आहेत. अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांचे लग्न २६ सप्टेंबर २०१४ मध्ये झाले. दोन वर्षांपूर्वी अजिंक्य आणि राधिका राघव या त्यांच्या मुलाच्या रूपात दुसऱ्यांदा आई-बाबा झाले.

या मराठमोळ्या जोडीला २०१९ मध्ये एक मुलगी झाली. अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांची प्रेमकहाणी जुन्या बॉलिवूड चित्रपटांची आठवण करून देणारी आहे.