IND vs IRE : मिशन आयर्लंड...! ट्वेंटी-२० मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज; 'बूम बूम बुमराह' है तय्यार

jasprit bumrah t20 : १८ ऑगस्टपासून भारत आणि आयर्लंड यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेला सुरूवात होत आहे.

मोठ्या कालावधीनंतर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मैदानात परतत आहे. आयर्लंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतून पुनरागमन करण्यासाठी 'बूम बूम बुमराह' सज्ज आहे.

१८ ऑगस्टपासून आगामी मालिकेला सुरूवात आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर आहे, तर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आगामी मालिकेसाठी भारताच्या कोचिंग स्टाफमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. खरं तर भारतीय संघाचे नियमित प्रशिक्षक राहुल द्रविडऐवजी व्हीव्हीएस लक्ष्मण आयर्लंड दौऱ्यावर प्रशिक्षक असतील, असे मानले जात होते. परंतु, या दोघांनाही विश्रांती देण्यात आली असून आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून सितांशू कोटक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला असून बीसीसीआयने याची झलक शेअर केली आहे.

युवा खेळाडू रिंकू सिंगला देखील आगामी मालिकेत संधी मिळाली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेला यशस्वी जैस्वाल देखील आयर्लंडविरूद्ध मैदानात असणार आहे.

वन डे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

तसेच वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या हार्दिक पांड्या, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव यांना आयर्लंड दौऱ्यातून वगळण्यात आले आहे.

मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करत असलेल्या जसप्रीत बुमराहच्या कामगिरीकडे क्रीडा वर्तुळाचे लक्ष लागले आहे.