विराटची एनर्जीच निघून जाते, त्याने तर...! कोहली बद्दल हे काय म्हणाला शोएब अख्तर? चाहते संतापले

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने ( Shoaib Akhtar) जगातील नंबर वन फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) याला पुन्हा एकदा सल्ला दिला आहे.

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने ( Shoaib Akhtar) जगातील नंबर वन फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) याला पुन्हा एकदा मजेशीर सल्ला दिला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वन डे मालिकेतील विराटच्या कामगिरीवरून शोएबने हा सल्ला दिलाय.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत विराटने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विराटने शतक झळकावताना तीन वर्षांचा कसोटी शतकाचा दुष्काळ संपवला. भारतीय संघाने तीन कसोटी मालिका २-१ अशी जिंकली आणि सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश पक्का केला.

महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा शतकांचा विक्रम विराट कोहली मोडेल असा दावा अख्तरने त्यावेळी केला होता. आता त्याने विराटला एक अजब सल्ला दिला आहे. विराट कोहलीचा सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये फॉर्म परतला असताना अख्तरने भारतीय फलंदाजाला दोनच फॉरमॅटमध्ये खेळण्याचा सल्ला दिला आहे.

''एक क्रिकेटपटू म्हणून तुम्ही मला विचाराल, तर विराटने कसोटी व वन डे क्रिकेट खेळायला हवं. ट्वेंटी-२० क्रिकेट त्याची एनर्जी काढून घेतं. तो या फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी आतुर असतो, त्याला ट्वेंटी-२० खेळायचं असतं. पण, त्याचवेळी शरिरातील एनर्जी वाचवण्याचीही गरज आहे,''असे अख्तर म्हणाला.

त्याने पुढे म्हटले की,''विराट आता किती वर्षांचा आहे? ३४ बरोबर? तो अजून सहज ६ ते ८ वर्ष खेळू शकतो. त्याने अजून ३०-५० कसोटी सामने खेळले तर त्यात तो सहज २५ शतकं झळकावू शकतो.'' विराट कोहलीच्या नावावर कसोटीत २८ शतकं आहेत आणि आंतरराष्ट्रीय शतकांमध्ये तो ७५ आकड्यासह सचिन तेंडुलकरनंतर ( १००) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

३४ वर्षीय विराजने १०८ कसोटींत ८४१६ धावा केल्या आहेत. अख्तर म्हणाला,''शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्याचं आव्हान त्याच्यासमोर आहे. नशिबाने तो कणखर आहे आणि तो पंजाबी आहे. तो असाच राहिला तर १०० शतकं सहज करेल. बाबर आजम आणि विराट यांच्यापैकी ग्रेट कोण, हा चर्चेचा विषय असला तरी माझ्यासाठी दोन्ही ग्रेट आहेत.''