T20 World Cup : कोण म्हणतं भारतीय व पाकिस्तानी एकत्र काम करू शकत नाही?; ओमान संघानं बदलला इतिहास

T20 World Cup : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील India vs Pakistan लढतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही देशांमधील राजकिय संबंध ताणलेले आहेत आणि त्यामुळेच द्विदेशीय मालिकाही बंद आहेत. दर्दी क्रिकेटचाहत्यांना केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आणि आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना पाहायला मिळतोय. या शेजाऱ्यांमध्ये दूरावा असला तरी ओमानच्या संघांनं भारतीय व पाकिस्तानी यांना एकत्र आणले आहे. ओमानच्या संघातील बहुतेक खेळाडू हे भारतात व पाकिस्तानात जन्मलेले आहेत...

ओमानच्या संघाला मंगळवारी बांगलादेशकडून २६ धावांनी हार पत्करावी लागली. असे असले तरी Super 12मध्ये प्रवेश करण्याची त्यांची संधी अजूनही कायम आहे. त्यांचा अखेरचा साखळी सामना स्कॉटलंडविरुद्ध आहे आणि त्यात त्यांनी विजय मिळवल्यास, ते बांगलादेशला बाजूला टाकून Super 12मध्ये एन्ट्री मारू शकतात.

ओमानचा सलामीवीर अकिब इलियास ( Aqib Ilyas Sulehri) याचा जन्म सिआलकोटचा आहे. त्यानं १५ वन डेत ७४४, २४ ट्वेंटी-२०त ४६४ धावा केल्या आहेत.

जतिंदर सिंग ( Jatinder Singh) याचा जन्म पंजाबमधील लुधियाना येथील आहे. त्यानंही ओमानकडून १९ वन डे व ३० ट्वेंटी-२० सामन्यांत अनुक्रमे ४३४ व ८१० धावा केल्या आहेत. जतिंदरनं आजच्या सामन्यात ४० धावांची खेळी केली.

कर्णधार झीशान मक्सूद ( Zeeshan Maqsood) याचा जन्म पाकिस्तानातील चिचावटनी येथील... त्यानं ओमानकडून १९ वन डे त ४४१ धावा व ३३ ट्वेंटी-२०त ५५९ धावा केल्या आहेत.

अयान खान ( Ayaan Khan) हा मध्यप्रदेश येथील भोपाळ येथे जन्मलेला खेळाडू... अष्टपैलू अयाननं ओमानसाठी १० वन डे व दोन ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत.

संदीप गौड ( Sandeep Goud) आंध्रप्रदेशमध्ये जन्मलेल्या या खेळाडूनं १९ वन डे व १७ ट्वेंटी-२०त ओमानचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे ३०३ व ९३ धावा केल्या आहेत.

कश्यप प्रजापती ( Kashyap Harishbhai Prajapati) याचा जन्म गुजरातमधील खेडा गावचा. त्यानं ओमानकडून ४ वन डे ( ४३ धावा) व २ ट्वेंटी-२० ( २१ धावा) सामने खेळले आहेत.

नसीम खुशी ( Muhammad Naseem Khushi), अय्याज बट्ट ( Ahmad Fayyaz Butt) व मोहम्मद नदीम ( Mohammad Nadeem) हे सियालकोटचे, कलिमुल्लाह ( Kaleemullah) हाही पाकिस्तानातील गुज्रानवाला येथील, बिलाल खान ( Bilal Khan) हा पेशावरचा आहे.