T20 World Cup, PAK vs ZIM : झिम्बाब्वेकडून हार, पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाद? शेजाऱ्यांचं नशीब टीम इंडियाच्या हाती

T20 World Cup, Pakistan vs Zimbabwe : झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात धक्कादायक विजय नोंदवला. ग्रुप २ मधील गुरुवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानला १ धावेने हार मानावी लागली.

T20 World Cup, Qualification scenarios : झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात धक्कादायक विजय नोंदवला. ग्रुप २ मधील गुरुवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानला १ धावेने हार मानावी लागली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत १ धावेने पराभूत होण्याची ही पाकिस्ताची दुसरी वेळ आहे. २०१०मध्ये न्यूझीलंडने त्यांना असे पराभूत केले होते, परंतु आजचा पराभव हा पाकिस्तानला स्पर्धेबाहेर करण्यासाठी कारणीभूत ठरणारा आहे.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत १ धावेने पराभूत होण्याची ही पाकिस्ताची दुसरी वेळ आहे. २०१०मध्ये न्यूझीलंडने त्यांना असे पराभूत केले होते, परंतु आजचा पराभव हा पाकिस्तानला स्पर्धेबाहेर करण्यासाठी कारणीभूत ठरणारा आहे.

भारताकडून पहिल्याच सामन्यात पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान या सामन्यातून कमबॅक करेल अशी अपेक्षा होती, परंतु झिम्बाब्वेने अनपेक्षित कामगिरी करताना त्यांना गुडघे टेकण्यास भाग पाडले.

प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने ८ बाद १३० धावा केल्या. वेस्ली मॅधेव्हेर ( १७) व क्रेग एर्व्हिन ( १९) यांनी आक्रमक सुरूवात केली, परंतु पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. सिन विलियम्स ( ३१) याने चांगला संघर्ष केला. रायन बर्ल ( १०) व ब्रॅड एव्हान्स ( १९) यांचेही योगदान लाभले. पाकिस्तानच्या मोहम्मद वासीमने ४ आणि शादाब खानने ३ विकेट्स घेतल्या.

पाकिस्तान हे लक्ष्य सहज पार करेल असे वाटले होते. पण, मोहम्मद रिझवान ( १४) व बाबर आजम (४) अपयशी ठरले. इफ्तिखार अहमद ( ५) व हैदर अली (० ) यांनीही निराश केले. शान मसूद ४४ धावांवर बाद झाल्यानंतरही मोहम्मद नवाजने संघर्ष सुरू ठेवला होता. पण तोही अखेरच्या षटकात बाद झाला आणि १ चेंडूंत ३ धावा हव्या असताना शाहिन आफ्रिदी रन आऊट झाला.

पाकिस्तानला ९ बाद १२९ धावा करता आल्या आणि झिम्बाब्वेने ऐतिहासिक विजय मिळवला. सिकंदर रजाने ३ व ब्रॅड इव्हान्सने २ विकेट्स घेतल्या. ब्लेसिंग मुझाराबानी व रिचर्ड एनगारावा यांनीही चांगली गोलंदाजी केली. पाकिस्तानचा हा पराभव सेमी फायनलचा त्यांचा मार्ग खडतर करणारा ठरला आहे.

ग्रुप २ मध्ये भारतीय संघ दोन विजयासह ४ गुणांची कमाई करताना अव्वल स्थानावर आहे, दक्षिण आफ्रिका ३ गुणांसह दुसऱ्या, तर झिम्बाब्वे ३ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान व नेदरलँड्स यांना दोन्ही सामने गमवावे लागल्याने त्यांचे खाते रिकामी आहे

पाकिस्तानचा पुढील मुकाबला दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स व बांगलादेश यांच्याशी आहे आणि या तीनही लढती जिंकल्या तरी त्यांच्या खात्यात ६ गुण होतील. त्यांना उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल.

आफ्रिकेला उर्वरित सामन्यांत पाकिस्तानसह नेदरलँड्स, भारत व बांगलादेश यांच्याशी भिडावे लागेल. अशात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ही मॅच पाकिस्तानसाठी निर्णायक ठरणार आहे.