T20 World Cup 2022 : 'हा' खेळाडू MS Dhoni प्रमाणेच फलंदाजी करायला शिकलाय, सुरेश रैनाचा मोठा दावा

टी-20 विश्वचषक सुरू होण्यासाठी केवळ एकच दिवस बाकी आहे. भारताचा पहिला सामना २३ तारखेला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

टी-20 विश्वचषक सुरू होण्यासाठी केवळ एकच दिवस बाकी आहे. या मेगा इव्हेंटची पहिली फेरी 16 ऑक्टोबरपासून खेळवली जाईल, तर सुपर 12 फेरी 22 ऑक्टोबर पासून सुरू होईल. 23 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

बाबर आझमच्या संघाविरुद्धच्या मागील अनेक सामन्यांचे निकाल लक्षात घेता रोहित शर्माला हा सामना हलक्यात घ्यायचा नाही आणि गेल्या टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्याकडेही तो लक्ष केंद्रित करेल. अशा परिस्थितीत सर्व भारतीय खेळाडूंना एकत्रितपणे जबरदस्त कामगिरी करावी लागेल.

दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने या मोठ्या स्पर्धेत फिनिशरची भूमिका बजावणाऱ्या खेळाडूचे नाव जाहीर सांगितले आहे. यासोबतच त्याने विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचेही गेम चेंजर्स म्हणून वर्णन केले आहे.

'हार्दिक पंड्याची भूमिकाही खूप महत्त्वाची असेल. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करण्याची त्याची क्षमता त्याला सर्वात महत्त्वाची ठरते. हार्दिकने एमएस धोनीप्रमाणे फलंदाजी शिकली आहे. विश्वचषकादरम्यान तो फिनिशर म्हणून या क्षमतेचा वापर करताना दिसेल, असे दिसते, असे रैना टाईम्स नाऊशी बोलताना म्हणाला.

मला रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाकडून खूप आशा आहेत. रोहित शर्मा अनुकूल कर्णधार असून तो विश्वचषकात संघाचे नेतृत्व करणार आहे. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या विश्वचषकातील कामगिरीबद्दल आपण खूप उत्साहित आहे. दोघेही उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत, संघासाठी गेम चेंजर ठरू शकतात, असेही त्याने स्पष्ट केले. भारत पाकिस्तान सामना सामान्य सामान्यांप्रमाणे नसतो. त्यात खेळाडूंवर दबाव असतो, असेही त्याने सांगितले.

हा सामना इतर सामन्यांसारखा नसेल. नेहमीप्रमाणे दबाव असेल. मी पाकिस्तानविरुद्ध खेळलो आहे आणि त्या काळात कोणते दडपण असेल हे मला चांगलेच समजते. गतवर्षी विश्वचषकात भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. पण यावेळी भारतीय संघ विजयाची नोंद करेल. पाकिस्तानविरुद्धचा भारताचा विजय हा दिवाळीत फटाक्यासारखं काम करेल, असेही रैना म्हणाला.