Join us  

IPL 2021साठी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा पाकिस्तानला ठेंगा; खवळलेल्या शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 4:21 PM

Open in App
1 / 7

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वासाठी पाकिस्तानविरुद्धची वन डे मालिका मध्येच सोडून दक्षिण आफ्रिकेचे पाच खेळाडू भारतात दाखल झाले. त्याचा फटका आफ्रिकेला बसला अन् तिसऱ्या व निर्णायक सामन्यात पाकिस्ताननं विजय मिळवत मालिका २-१ अशी जिंकली.

2 / 7

पाकिस्तानचा संघ सध्या आफ्रिका दौऱ्यावर आहे आणि तेथे तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. वन डे मालिकेतील दोन सामन्यानंतर १-१ अशी बरोबरी झाली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज क्विंटन डी कॉक, लुंगी एनगिडी, डेव्हिड मिलर, एनरिच नॉर्ट्जे आणि कागिसो रबाडा हे आयपीएलच्या १४व्या पर्वासाठी भारतात आले आहेत.

3 / 7

क्विंटन डी कॉक ( मुंबई इंडियन्स)प्रमाणे कागिसो रबाडा व अॅनरिच नॉर्टजे ( दोघंही दिल्ली कॅपिटल्स), लुंगी एनगिडी ( चेन्नई सुपर किंग्स ) आणि डेव्हिड मिलर ( राजस्थान रॉयल्स) यांचाही वन डे मालिकेसाठी आफ्रिकेच्या संघात समावेश केला गेला होता. पण, दुसऱ्या वन डे सामन्यानंतर ते भारतात दाखल झाले.

4 / 7

आता यावरून पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी खवळला. त्यानं पाकिस्तानच्या मालिका विजयाचा आनंद साजरा न करता दक्षिण आफ्रिकेला खडेबोल सुनावले आणि आयपीएलबाबत वादग्रस्त विधान केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर आयपीएलचे वर्चस्व वाढताना दिसत आहे, असा आरोप त्यानं केलं.

5 / 7

आफ्रिदीनं ट्विट केलं की,''पाकिस्तान संघाला मालिका विजयासाठी अभिनंदन. बाबर आझमनं पुन्हा एकदा त्याच्या दमदार कामगिरीची झलक दाखवली. फखर जमानची खेळी पाहून आनंद झाला.''

6 / 7

तो पुढे म्हणाला,''दक्षिण आफ्रिकेनं मालिका सुरू असताना खेळाडूंना आयपीएलसाठी परवानगी दिली, हे पाहून आश्चर्य वाटत आहे. एखादी ट्वेंटी-२०लीग आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर भारी पडताना दुःख होत आहे. याबाबत पुन्हा विचार करण्याची गरज आहे.''

7 / 7

दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी सांगितले होते की,''आम्ही आमच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळता यावं यासाठी बीसीसीआयसोबत काही सामंजस्य करार केले आहेत. त्यानुसारच आम्ही आयपीएल २०२१पासून खेळाडूंना रोखू शकत नाही. या पाच खेळाडूंना भारतात जाऊन आयपीएलमध्ये खेळावे लागेल. आयपीएलमध्ये खेळून त्यांना आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची तयारीही करता येईल. त्यांना भारतीय खेळपट्टीचा चांगला अभ्यास करता येईल.''

टॅग्स :आयपीएल २०२१शाहिद अफ्रिदीद. आफ्रिकापाकिस्तान