अभिनेत्रींनाही टक्कर देणारी श्रीलंकन क्रिकेटरची ग्लॅमरस पत्नी; फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

श्रीलंकन क्रिकेटरची पत्नी फारशी प्रकाशझोतात नसते, पण...

श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसंका टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला शतकवीर ठरला. त्याच्या दमदार कामगिरीनंतर तो चांगलाच चर्चेत आहे. क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय तो स्टाइल स्टेटमेंटमुळे चर्चेत राहणाऱ्या क्रिकेटरपैकी एक आहे.

क्रिकेटरच्या मैदानातील कामगिरीनंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीबद्दलही चर्चा रंगताना दिसते. निसंकाबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये तीच उत्सुकता दिसून येते. इथं जाणून घेऊयात श्रीलंकन क्रिकेटरच्या पत्नीसंदर्भातील खास स्टोरी

पथुम निसांकाच्या पत्नीचे नाव इशा कुमारसिंघे (Esha Kumarasinghe) असं आहे. क्रिकेटर अनेकदा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यासोबतचे खास बॉन्डिंग दाखवणारे फोटो शेअर करत असतो.

श्रीलंकन क्रिकेटरची पत्नी फारशी प्रकाश झोतात नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपली खास झलक दाखवून देताना दिसते.

निसंकाची पत्नी स्टाईल स्टेटमेंटच्या बाबतीत हिरोईनींनाही तगडी फाईट देताना दिसते. तिचा हा अंदाज ती एखादी प्रसिद्ध मॉडेल असल्याचे चित्रच निर्माण करते.

सोशल मीडियावर बोल्ड अंदाजातील फोटो शेअर करत अनेकदा इशा आपल्या चाहत्यांना 'क्लीन बोल्ड' करतानाही पाहायला मिळाले आहे.

स्विमिंग पूलचावरील तिचा हा फोटो तिच्या बोल्डनेसशिवाय फिटनेसची खास झलक दाखवून देणारा आहे.

क्रिकेटच्या पत्नीच्या या फोटोतून तिची अलिशान जीवनशैलीची झलक आणि फॅशनच्या बाबतीत कोणत्याही गोष्टीत कमी नसल्याची गोष्टही दाखवून देणारी आहे.

सिंपल आउटफिट्समध्ये परफेक्ट लूक कसा मिळवायचा? याचा सेन्स तिच्या या फोटोतून पाहायला मिळतो.

इशा कुमारसिंघे हिने अनेकदा निसंकासाठी चीअरगर्ल होऊनही मैफील लुटली आहे. या फोटोतील तिच्या अदाकारीलाही तोड नाही.