See Photo : टीम इंडियाचा गोलंदाज अडकला लग्नबंधनात; ताशाला बनवलं जीवन साथी!

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज संदीप शर्मा हा लग्नबंधनात अडकला आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२१च्या पर्वातील दुसऱ्या टप्प्याला सुरूवात होण्याआधी त्यानं लग्न केलं. SRH pacer Sandeep Sharma ties the knot ahead of IPL 2021

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज संदीप शर्मा हा लग्नबंधनात अडकला आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२१च्या पर्वातील दुसऱ्या टप्प्याला सुरूवात होण्याआधी त्यानं लग्न केलं.

आयपीएलमधील त्याचा संघ सनरायझर्स हैदराबाद यांनी त्याला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. संदीपनं ताशा सैथविक हिच्याशी लग्न केलं असून अनेक वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध आहेत.

संदीप शर्मानं २०१५ साली भारताकडून दोन ट्वेंटी-२० सामने खेळले होते. पण, त्यानंतर त्याला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. या दोन सामन्यांत त्यानं एक विकेट घेतली.

संदीपला २०१८च्या आयपीएल लिलावात ३ कोटी रुपये मोजून सनरायझर्स हैदराबादनं आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. त्यानं SRHकडून ३९ विकेट्स घेतल्या आहेत.

संदीपनं कारकीर्दित १४३ ट्वेंटी-२० सामन्यांत १५९ विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं ८ धावा देत ४ विकेट्स घेत सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी केली आहे. ४४ प्रथम श्रेणी सामन्यांत त्यानं १६७ विकेट्स, तर ४९ लिस्ट ए सामन्यात ८० विकेट्स घेतल्या आहेत.

Read in English