IPL 2026: आयपीएलमधील बॅन झालेले ८ स्टार खेळाडू, यादीत ३ भारतीय; कोणावर का झाली कारवाई?

IPL Banned Players List: आयपीएलच्या ग्लॅमरस जगात केवळ पैसा आणि प्रसिद्धीच नाही, तर कडक शिस्तही आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आतापर्यंत ८ दिग्गज खेळाडूंना आयपीएलमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

स्टीव स्मिथ (ऑस्ट्रेलिया): २०१८ मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथवर बंदी घातली होती. त्याचे पडसाद आयपीएलवरही उमटले आणि त्याला २०१८ च्या हंगामातून बाहेर व्हावे लागले.

डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया): स्मिथप्रमाणेच वॉर्नर देखील बॉल टॅम्परिंग वादात अडकला होता. परिणामी, त्याला सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद गमवावे लागले आणि २०१८ च्या हंगामात खेळण्यावर बंदी आली.

हॅरी ब्रूक (इंग्लंड): शेवटच्या क्षणी आयपीएलमधून नाव मागे घेतल्यामुळे बीसीसीआयने नवीन नियमांनुसार ब्रूकवर दोन वर्षांची बंदी घातली आहे. त्याने २०२५ च्या हंगामातून माघार घेतली होती.

मोहम्मद आसिफ (पाकिस्तान): २००८ च्या पहिल्या हंगामात दिल्ली डेअरडेव्हिल्स्कडून खेळताना आसिफ प्रतिबंधित अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) सेवनात दोषी आढळला होता. त्यानंतर त्याच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली.

ल्यूक पोमर्सबॅक (ऑस्ट्रेलिया): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना ल्यूकवर एका महिलेवर आणि तिच्या मंगेतरावर हल्ला केल्याचा आरोप झाला होता. या गंभीर प्रकरणानंतर आरसीबीने त्याला संघातून निलंबित केले होते.

हरभजन सिंह (भारत): आयपीएलच्या पहिल्याच हंगामात (२००८) मुंबई इंडियन्सकडून खेळताना हरभजनने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या श्रीसंतला कानशिलात लगावली होती. या स्लॅपगेट प्रकरणामुळे त्याला संपूर्ण हंगामासाठी बॅन करण्यात आले होते.

रवींद्र जडेजा (भारत): टीम इंडियाचा हा स्टार अष्टपैलू खेळाडू २०१० च्या आयपीएल हंगामात खेळू शकला नव्हता. राजस्थान रॉयल्स व्यतिरिक्त इतर संघांशी मानधनाबाबत परस्पर वाटाघाटी केल्यामुळे बीसीसीआयने त्याच्यावर एका वर्षाची बंदी घातली होती.

प्रवीण तांबे (भारत): वयाच्या ४२ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करून सर्वांना चकित करणाऱ्या तांबेवर २०१९ मध्ये बंदी घालण्यात आली. बीसीसीआयच्या परवानगीशिवाय परदेशातील टी-१० लीगमध्ये खेळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती.