Join us  

Shoaib Malik, Sania Mirza: शोएब मलिकचे पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत रोमँटिक फोटो व्हायरल, आता सानिया मिर्झाला मिळताहेत असे सल्ले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 1:34 PM

Open in App
1 / 9

पाकिस्तानचा क्रिकेटपटू आणि सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक याचे पाकिस्तानी अभिनेत्री आएशा उमर हिच्यासोबतचे रोमँटिक आमि सिझलिंग फोटो सोशल मीडियाव मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. आएशा उमर हिनेही हे फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंवरून शेअर केले आहेत. दरम्यान, हे फोटो पाहून फॅन्सनी सानिया मिर्झाला सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

2 / 9

शोएब मलिक आणि आएशा उमर यांचे हे फोटो एका स्थानिक नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहेत. हे फोटो गेल्या महिन्यातील आहेत. आएशा उमर हिने स्कॉटलंडविरोधात शोएब मलिकच्या वादळी खेळीनंतर काही फोटो शेअर केले होते. तसेच ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान यांच्यात झालेल्या उपांत्य सामन्या दिवशीसुद्धा शोएबसोबत स्वीमिंग पूलमधील फोटो शेअर केले होते. या फोटोंनंतर नेटिझन्सकडून सानिया मिर्झाला वेगवेगळे सल्ले मिळत आहेत.

3 / 9

शोएब मलिक आणि आएशा उमर यांच्यातील हे फोटोशूट चर्चेचा विषय ठरला असून, सानिया मिर्झाने एवढ्या सिझलिंग आणि रोमँटिक फोटोशूटसाठी पतीला परवानगी कशी काय दिली असा प्रश्न विचारला जात आहे.

4 / 9

या फोटोशूटबाबत आएशा उमर सांगते की, कुठल्याही मुला-मुलीचे रोमँटिक फोटोशूट अफेअरच्या दिशेने इशारा करत नाही. हे फोटो पाहून शोएब मलिकशी विवाह करण्याचा विचार आहे का असे, आएशाला विचारले असता तिने अजिबात नाही, असे उत्तर दिले.

5 / 9

आएशा पुढे म्हणाली, शोएब मलिक विवाहित आहे. तसेच तो त्याच्या पत्नीसोबत खूश आहे. मी शोएब मलिक आणि सानिया मिर्झाचा आदर करते. शोएब आणि मी एकमेकांचे चांगले मित्र आहोत, तसेच एकमेकांचे शुभचिंतक आहोत.

6 / 9

स्कॉटलंडविरुद्ध १८ चेंडूत नाबाद ५४ धावांची खेळी केल्यानंतर शोएब मलिकसोबतचे हे फोटो आएशा उमरने शेअर केले होते. त्यावेळी शोएब मलिक सोशल मीडियावर ट्रेंड होत होता.

7 / 9

आएशा उमरने हल्लीच तिच्या लोकप्रिय सिटकॉम बुलबुलेची ११ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन केले होते. तिने दुबईमध्ये फिल्मफेअर मिडल ईस्ट अचिव्हर्स नाईटमध्येही सहभाग घेतला होता.

8 / 9

यावर्षी जानेवारीमध्ये आएशा उमरवर एका ट्रोलरने बेहयाई म्हणजेच अश्लिलता पसरवत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर तिने त्याला सडेतोड उत्तर दिले होते.

9 / 9

मी महिलांना त्यांचे शरीर एक्सपोझ करण्यास सांगत नाही आहे. ती त्यांची आवड आहे. कारण हा ड्रेस घालणे ही माझी आवड होती. तसेच तुम्हाला जे आवडते, ते तुम्ही परिधान केले पाहिजे, असे तिने म्हटले होते.

टॅग्स :शोएब मलिकसानिया मिर्झापाकिस्तान
Open in App