शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

Shikhar Dhawan Sophie Shine Relation Confirmed: शिखर धवनचं सोफी शाईनला डेट करत असल्याच्या चर्चा Champions Trophy पासून रंगल्या होत्या

टीम इंडियाचा माजी सलामीवीर शिखर धवन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आएशा मुखर्जीशी घटस्फोट घेतल्यानंतर शिखर धवनने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक नवीन इनिंग सुरू केली आहे.

अबू धाबी येथील आयरिश तरुणी सोफी शाईनसोबत त्याचे अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातच सोफीने गुरूवारी इंस्टाग्रामवर शिखर धवनसोबतचा एक फोटो पोस्ट केला.

सोफी शाईनने शिखर धवनच्या इंस्टाग्राम अकाउंट सोबत कोलॅबरेशन करून हा फोटो शेअर केला. विशेष म्हणजे, या फोटोला “माझं प्रेम” असं कॅप्शन देत त्यांनी प्रेमाची कबुली दिली.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात शिखर धवन आणि सोफी एकत्र दिसले होते. त्याशिवाय अनेकदा ते एकत्र फिरताना दिसले होते.

२०२४च्या अखेरीसही शिखर धवनसोबत सोफी देखील दिसली होती, असे स्मार्ट नेटिझन्सनी लगेचच निदर्शनास आणून दिले, ज्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला.

शिखर धवनने १३ जून २०२३ रोजी सोफीच्या इंस्टाग्राम पोस्टला पहिल्यांदा लाईक केले. रिपोर्ट्सनुसार, शिखर आणि सोफी काही वर्षांपूर्वी दुबईत भेटले होते.

सोफीने IPL 2024चे फोटो शेअर केले होते. तेव्हा धवन पंजाब किंग्जचा भाग होता. मैत्रीपासून प्रेमापर्यंत असा त्यांचा प्रवास झाला. दोघेही एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

सोफी शाइन मूळची आयर्लंडची आहे. अबू धाबी येथील नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशनमध्ये ती वरिष्ठ पदावर आहे. तिने लिमरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मार्केटिंगची पदवी घेतली आहे.

ती एक प्रभावी व्यावसायिक पार्श्वभूमी असलेली प्रोडक्ट कन्सल्टंट आहे. त्यापूर्वी आयर्लंडमधील कॅसलरॉय कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले. सोफी आकर्षक लूकमुळे नेटिझन्सचे लक्ष वेधून घेते.