Cricket Buzz»फोटो गॅलरी »विराट कोहली-अनुष्का शर्माचे क्वारंटाईनमधील CanDid फोटो व्हायरलविराट कोहली-अनुष्का शर्माचे क्वारंटाईनमधील CanDid फोटो व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 2:07 PMOpen in App1 / 7लॉकडाऊनमुळे खेळाडूंना आपापल्या कुटुंबीयांना भरपूर वेळ द्यायला मिळत आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हेही एकत्र वेळ घालवत आहेत.2 / 711 डिसेंबर 2017मध्ये या दोघांनी कुटुंबातील मोजक्याच माणसांसह इटलीत विवाह केला. त्यानंतर सततचे दौरे आणि चित्रिकरणात व्यग्र असल्यामुळे विराट-अनुष्का यांना एकमेकांना पुरेसा वेळ द्यायलाच मिळाला नाही.3 / 7लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले. विराटनंही ते कबुल केलं की दोन वर्षांत अनुष्कासोबत सर्वाधिक वेळ घालवता आला.4 / 7विराट नेहमी अनुष्काचं कौतुक करतो. तिच्यामुळे रागावर नियंत्रण राखण्यास शिकल्याचं त्यानं अनेकदा जाहीररित्या सांगितले आहे.5 / 7लॉकडाऊनमुळे एकमेकांसोबत बराच वेळ घालवणाऱ्या या जोडीचे कॅनडिड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.6 / 7विराट-अनुष्का यांनी कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला मदत केली आहे.7 / 7या दोघांनी महाराष्ट्र पोलिसांसाठी प्रत्येकी 5 लाख रुपयेही दिले आहेत आणखी वाचा Subscribe to Notifications