Join us  

"तेव्हा मी रात्री २ ला घरी आलो आणि पहाटे ५ वाजता..."; २५ वर्षांच्या सरफराज खानचं सुनील गावसकरांना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 1:59 PM

Open in App
1 / 6

Sarfaraz Khan Sunil Gavaskar: देशांतर्गत क्रिकेटमध्ये दीर्घकाळ चमकदार कामगिरी करूनही 'टीम इंडिया'मध्ये निवड न झाल्याबद्दल मुंबईचा फलंदाज सरफराज खानने मौन सोडले. दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी फिटनेसमुळे भारतीय संघात न घेतल्याबद्दल दिलेल्या 'फॅशन शो' विधानावर सरफराजने आपली प्रतिक्रिया दिली.

2 / 6

IPLमध्ये सरफराजला दिल्ली कॅपिटल्सने 20 लाखांना विकत घेतले. सरफराजने अलीकडेच सहा रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये तीन लागोपाठ शतके ठोकून शानदार फॉर्म दाखवला आणि सर्वांना आश्चर्यचकित केले. पण असे असूनही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याला संधी मिळाली नाही.

3 / 6

सरफराज खान मुद्द्यावर सुनील गावसकर यांनी BCCIच्या निवडकर्त्यांवर टीका करत म्हणाले की, 'निवडकर्त्यांना संघासाठी मॉडेल निवडायचे असेल तर त्यांनी फॅशन शोमध्ये जावे'. सुनील गावसकर यांनी केलेल्या विधानावर सरफराजने प्रतिक्रिया दिली आहे.

4 / 6

सरफराज म्हणाला, 'मी काही दिवसांपूर्वीच ऐकले आहे की (सुनील गावसकर फॅशन शोबद्दल) बोलले. मी रणजी ट्रॉफी खेळण्यात व्यस्त होतो त्यामुळे सकाळीच त्यांचे काय म्हणणे आहे ते मी पाहिले. फिटनेस नक्कीच महत्त्वाचा आहे आणि मी माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न करतो.'

5 / 6

'मैदानात धावा काढण्याबद्दलची गोष्ट असेल तर मी रणजी आणि आयपीएल दोन्हीमध्ये त्याबद्दल माझी कामगिरी दाखवून दिली आहे. दिल्लीच्या संघाने नुकताच फिटनेस कॅम्प घेतला त्यात आम्ही खूप सराव केला. जे शक्य आहे ते सारं काही मी करतो'

6 / 6

'मला ही गोष्ट सांगावीशी वाटते की आमचा शेवटचा रणजी सामना संपला तेव्हा मी रात्री २ वाजता घरी आलो आणि पहाटे ५ वाजता मैदानावर सरावासाठी परतलो. माझा ग्राउंड फिटनेस परिपूर्ण आहे. त्यामुळे मी माझ्या परीने सर्व प्रकारचे प्रयत्न करतोय,' असे सरफराजने उत्तर दिले.

टॅग्स :सुनील गावसकरमुंबईरणजी करंडकफॅशन
Open in App