सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS

Sara Tendulkar at Shri Kashi Vishwanath Temple Photos : सचिन तेंडुलकरची लेक सारा आपल्या आईसोबत देवाच्या दारी आशीर्वाद घ्यायला आली होती...

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर यांनी बाबा श्री काशी विश्वनाथ यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. मायलेकीच्या या जोडीने भक्तीभावाने आणि साधेपणाने पूजादेखील केली.

मंदिराचे मुख्य पुजारी पंडित श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली, दोघींनी बाबा विश्वनाथ यांचे पूजा विधी केले. पूजेदरम्यान, पुजाऱ्याने अंजली आणि साराच्या कपाळावर त्रिपुंड्र टिळक (देवतेचे खास चिन्ह) लावले.

कुठलाही मोठा लवाजमा घेऊन न येता आणि कसलाही बडेजाव न मिरवता अंजली आणि सारा यांनी सामान्य भक्तांप्रमाणे जमिनीवर बसून बाबांचा प्रसाद घेतला. त्यांच्या साधेपणाने आणि भक्तीभावाने सर्वांची मने जिंकली.

या भेटीदरम्यान मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वभूषण मिश्रा यांनी दोघांचेही विशेष स्वागत केले. त्यांनी अंजली तेंडुलकर आणि सारा यांना रुद्राक्षाचा हार, शाल आणि स्मृतिचिन्ह भेट म्हणून दिले.

काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या भव्यतेने आणि दिव्यतेने दोघीही खूप प्रभावित झाले. त्यांनी तेथील प्रशासनाचे कौतुक केले. संपूर्ण भेटीदरम्यान, मायलेकींची बाबा श्री काशी विश्वनाथ यांच्यावर असलेली श्रद्धा स्पष्टपणे दिसून आली.

इतर वेळी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश फोटो आणि रील्ससाठी ओळखली जाते. पण देवाच्या दारी येताना तिने साजेसा पोशाख केला होता आणि भक्तीभावाने बाबा श्री काशी विश्वनाथ यांची पूजा व सेवा केली.